Sunny Leone Saam TV
देश विदेश

Sunny Leone Admit Card : सनी लियोनी उत्तर प्रदेश पोलीस दलात सामील होणार? परीक्षेच्या प्रवेशपत्राचा फोटो व्हायरल

Sunny Leone Admit Card : अॅडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव सनी लिओनी असे लिहिली आहे. ज्यावर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटोही आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News :

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) उत्तर प्रदेश पोलीसमध्ये भरती होणार का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सनीच्या ॲडमिट कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे हॉल तिकीट सनी लिओनीच्या नावाने जारी करण्यात आले आहे.

अॅडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव सनी लिओन असे लिहिली आहे. ज्यावर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटोही आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आज 27 फेब्रुवारी आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12.05 अशी लिहिली आहे. प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर प्रदेश पोलीस भरतीसाठी राज्यातील 75 जिल्ह्यांतील 2385 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली गेली. या दोन दिवसीय परीक्षेत 48 लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होत आहेत. ही परीक्षा यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी घेतली जात आहे. दरम्यान, कन्नौज जिल्ह्यात सनी लिओनीच्या नावाचं अॅडमिट कार्ड समोर आलं आहे.  (Latest News Update)

व्हायरल झालेल्या अॅडमिट कार्डच्या फोटोनुसार, उमेदवाराला तिरवा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षेला बसायचे होते. उमेदवारांच्या यादीतील या उमेदवाराची माहिती ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कॉलेजला कळताच त्यांना धक्काच बसला. आता यूपी पोलीस अशा व्यक्तीचा शोध घेत आहेत ज्याने असे प्रवेशपत्र बनवले आहे. मात्र हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो, असेही बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT