Sultanpuri Delhi Case  Saam Tv
देश विदेश

Delhi Sultanpuri Case: दिल्ली कांझावाला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा अपघात की हत्या? 'त्या' व्हिडिओनंतर गूढ वाढलं

कंझावाला प्रकरणाचा अजूनही छडा लाऊ न शकल्यानं आता या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.

Shivaji Kale

Kanjhawala Case : कांझावाला प्रकरणात ३१ डिसेंबरच्या रात्री तरुणी स्कूटीचा अपघात झाला. यानंतर पाय त्या वाहनात अडकला. आरोपींनी तरुणीला तब्बल १३ किलोमीटरपर्यंत रस्त्यावर फरफटत नेलं. यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह रस्त्यावर टाकून ते पळून गेले. या घटनेला आता १०० तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा अजूनही छडा लाऊ न शकल्यानं आता या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. (Latest Marathi News)

१ जानेवारी रोजी रात्री अडीच वाजता पीसीआरला या घटनेबाबत पहिला कॉल आला होता. यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास दुसरा फोन आला. यादरम्यान एका महिलेचा मृतदेह कारखाली अडकला असून कार चालक तो फरफटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, दाट धुक्यामुळे कॉल करणाऱ्यांना त्या वाहनाचा नंबर पोलिसांना देता आला नाही,अशी माहिती पुढे आली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री मृत्यूमुखी पडलेल्या दिल्लीतील सुलतानपुरी - कांझावाला येथील तरुणीच्या मृत्यूचं गुढ दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे पोलिस आणि साक्षीदारांच्या बदलणाऱ्या भूमिकांवरही संशय व्यक्त केला जात आहे.

आज पोलिसांना सहकार्य न करणे आणि पुरावे लपविणे या प्रकरणात पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या पीडित तरुणीच्या मैत्रिणाला अटक केली, असं बोललं जात असताना पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं असं स्पष्टीकरण दिलं आहे.

या प्रकरणी पोलिसांना मैत्रिणीच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नव्यानं हाती आलेल्या फुटेजनुसार तरुणी आणि तिची मैत्रीण या दोघी आपल्या मित्रांसोबत सुकटीवर जाताना दिसत आहे. एका सीसीटीव्हीमध्ये ती रस्त्यावर धावताना दिसत आहे, तर दुसऱ्यामध्ये ती घरी पोहोचताना दिसत आहे.

तरुणीच्या मैत्रिणीच्या घरापर्यंत पोहोचण्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो रात्री 1:36 वाजताचा आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा अपघात 2 वाजून 04 वाजता ते 2 वाजून 6 वाजण्याच्या दरम्यान झाला. अशा परिस्थितीत अपघातापूर्वी पीडितेची मैत्रीण घरी कशी पोहोचली? असा सवाल उपस्थित केला जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वेळ ही ४५ मिनिटे मागे असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी, ज्या फुटेजमध्ये ती रस्त्यावर दिसत असून ते २.०२ मिनिटांचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही फुटेजच्या वेळेबाबत तपास आणि चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात सहावी अटक करण्यात आली असून आशुतोष ज्याची कार आहे त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

आतापर्यंत काय काय झालं?

१ जानेवारी - पोलिसांना तरुणीचा मृतदेह कांझावला इथं सापडला.

पोलिसांनी अपघाताच्या कलमाखाली गुन्हा दाखल करुन ५ आरोपींना अटक केली.

२ जानेवारी – पोलिसांनी सांगितलेल्या माहितीवरच प्रश्नचिन्ह

आरोपींच्या कलमात वाढ... निष्काळजीपणामुळे मृत्यूचं कलम ३०४ लावलं.

३ जानेवारी - प्रकरणात नवा वळण, पीडित तरुणीची मैत्रीणीची एन्ट्री

अपघाताच्या वेळी तरुणीची मैत्रीण तिच्यासोबत होती.

मैत्रिणीला तरुणीला नशेत असल्याचे सांगितले.

४ जानेवारी - शवविच्छेदन अहवालात दारुचा कुठेही उल्लेख नाही.

मैत्रिणीच्या घरी येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह, पीडितेच्या कुटुंबीयांनी मैत्रिणीचे दावे खोटे असल्याचे सांगितले

५ जानेवारी - मैत्रीण आणि तरुणीचा नवीन व्हिडीओ समोर आला

या प्रकरणात एकूण ७ आरोपी असल्याची पोलिसांची माहिती

६ जानेवारी - मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली.

सध्या पोलिस या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून चौकशी करत आहेत. पोलिसांची खात्या अंतर्गत चौकशी करण्यासाठी देखील समिती नेमण्यात आली आहे. मात्र, तरीही अद्यापपर्यंत तरुणीचा मृत्यू हा अपघात की हत्या याचा उलगडा झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT