court Saam Tv
देश विदेश

बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरण: आरोपींना जामीन मंजूर, कोर्ट म्हणतं...

बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरणातील २ आरोपींना दिल्ली कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sulli Deals: अॅपद्वारे अल्पसंख्याक महिलांची बदनामी करणाऱ्या आरोपींना आता दिलासा मिळाला आहे. बुल्ली बाई अॅप प्रकरणामधील आरोपी नीरज बिष्णोई आणि सुली डील्स अॅप तयार करणारा ओंकारेश्वर ठाकूर याला मानवीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली (Delhi) कोर्टाने हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपींनी पहिल्यांदा गुन्हा केला आहे. यामुळे तुरुंगवासात राहिल्यास त्यांच्यादृष्टीने हानीकारक ठरू शकणार आहे, असे देखील कोर्टाने सांगितले आहे. कोर्टाने जामीन देत असताना आरोपींसमोर (accused) काही अटी ठेवले आहेत. कोणत्या साक्षीदाराला न धमकावणे, पुराव्यांबरोबर छेडछाड करू नये या अटी ठेवले आहेत.

हे देखील पहा-

आरोपीने कोणत्याही पीडित व्यक्तीला संपर्क करणे, त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करू नये, अशा स्पष्ट सूचना कोर्टाने (Court) दिले आहेत. जामीनावर असताना आरोपीने आपला संपर्क क्रमांक आणि वास्तव्याची माहिती अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे. आरोपी आपला फोन कायम सुरू ठेवणार, तसेच आपल्या ठाव- ठिकाण्याची माहिती देणार आहेत. आरोपीने देश सोडू नये आणि प्रत्येक तारखेला न्यायालयामध्ये हजर रहावे लागणार आहे. जामिनावर असताना आरोपीने असा गुन्हा करू नये असे देखील आरोपींना बजावण्यात आले आहे.

नेमकं काय आहे 'सुली डिल्स' अ‍ॅप?

सुली हा मुस्लिम महिलांविषयी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. ४ जुलै २०२१ दिवशी ट्विटरवर सुली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहे. अ‍ॅपवर 'सुली डील ऑफ द डे' अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोबरोबर शेअर केली जात होती. हे फोटो मध्ये गिटहब (Github) अ‍ॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने त्यावर कारवाई झाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT