Mumbai Crime Saam TV
देश विदेश

Bhopal News: धक्कादायक! 'पप्पा माझ्या मित्रांना सांगा...' सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची कॉंग्रेस आमदाराच्या बंगल्यात आत्महत्या

सुसाईड नोटची फॉरेंन्सिक तपासणी होणार असून त्यावरील अक्षर पिडित मुलाचेचं आहे का? त्याने कोणाच्या दबावाखाली येवून ही नोट लिहली आहे का? याबद्दलची माहिती या तपासात घेतली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madhya Pradesh: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील काँग्रेस आमदार ओंकार मरकाम यांच्या बंगल्यावर एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी कॅन्सरने त्रस्त असून त्याच्यावर अभ्यासासोबतच आमदार निवासात उपचार सुरू होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. (Madhya Pradesh)

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून संबंधित विद्यार्थी तिरथ गेल्या चार वर्षांपासून कॉंग्रेस (Congress) आमदाराच्या सरकारी निवासस्थानी राहत होता. तिरथ कॅंन्सरग्रस्त असून त्याच्यावर उपचारही सुरू होते. फाशी घेण्यापूर्वी त्याने वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये त्याने पप्पा मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी खूप केले परंतु मीच कधी समजू शकलो नाही असे लिहले होते. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपल्या सुसाईड नोटमध्ये तिरथने "मम्मी, पप्पा काकी मला माफ करा, मी कधीही चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी तुम्हाला खूप त्रास दिला आता मी जात आहे. पप्पा तुम्ही आईची आज्जीची काळजी घ्या, मी तुम्हाला अजून त्रास देवू शकत नाही, तुम्ही माझ्यासाठी खूप केले काही केले आहे, पण मला ते समजले नाही, माझी कोणाविरुद्ध काही तक्रार नाही, मी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे," असे लिहले आहे,

त्याचबरोबर "पप्पा माझ्या मित्रांना सांगा आता तिरथ राहिला नाही," असे म्हणत त्याने त्याच्या मित्रांची नावेही लिहली आहेत. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सुसाईड नोटची फॉरेंन्सिक तपासणी होणार असून त्यावरील अक्षर पिडित मुलाचेचं आहे का? त्याने कोणाच्या दबावाखाली येवून ही नोट लिहली आहे का? याबद्दलची माहिती या तपासात घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT