धडकेनंतर एक बस उलटून पेट घेतल्याने भीषण दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार ७ ते ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुरत जिल्ह्यातील बारडोलीमधील उवा गावाजवळ भीषण अपघात झाला. महाराष्ट्रातील दोन प्रवासी लक्झरी बसेसची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर बस उलटली आणि तिने पेट घेतला. प्राथमिक अहवालानुसार, या भीषण अपघातात ७ ते ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचा संशय आहे. (Two buses collide head-on near Bardoli in Gujarat)
मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळून जाणाऱ्या महाराष्ट्रातील दोन प्रवासी बसेसची धडक झाली. धडकेनंतर एक बस रस्त्यावर उलटली. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. या भीषण अपघातानंतर परिसरात किंचाळ्यांनी दणाणून उठला. अपघातात बसचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघात झाल्याची माहिती मिळताच बारडोली अग्निशमन दलाच पथक आणि स्थानिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने बसची आग आटोक्यात आणली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्याची गंभीर परिस्थिती पाहता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही बस महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या आहेत. बस क्रमांक MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 क्रमांक असलेल्या बसची समोरासमोर धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की एक बस महामार्गावर उलटली. उलटल्यानंतर बसला आग लागली. क्षणार्धात आगीने बसला विळखा घातला. त्यामुळे बस मधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान झाला. महाराष्ट्र डेपोची एक एसटी बस धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात होती. या भीषण अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवर दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.