Sri Lanka Gotabaya Rajapakse Latest News Saam Tv
देश विदेश

Gotabaya Rajapakse : राजीनामा देण्यापूर्वीच श्रीलंकेचे राष्ट्रपती देश सोडून पळाले

गोटाबाया यांनी देश सोडला असल्याची माहिती मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

कोलंबो : श्रीलंकेवर सध्या मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. अन्नधान्यापासून ते इंधनापर्यंत सर्वच दैनंदीन गरजेच्या वस्तुंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाच्या विमानात पत्नी आणि 2 सुरक्षा रक्षकांसह गोटाबाया यांनी देश सोडला असल्याची माहिती मिळत आहे. (Gotabaya Rajapakse Latest News)

श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. महागाईने उच्चांक गाठल्याने तेथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीलंकेत अशीच परिस्थिती आहे.या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. ते 13 तारखेला म्हणजे आज राजीनामा देणार होते. मात्र राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी देश सोडल्याची माहिती समोर येत आहे.

गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी मालेला गेल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने श्रीलंकेतील काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. दुसरीकडे आंदोलकांनी सध्या राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयात आपला तळ ठोकला आहे. गोटाबाया राजपक्षे यांना दुबईला जायचे होते. परंतु बंदरनायके इंटरनॅशनलच्या कर्मचार्‍यांनी व्हीआयपी सेवांमधून माघार घेतली आणि सर्व प्रवाशांनी सार्वजनिक काउंटरमधून जावे असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांनी दुबईला जाता आले नाही. (Gotabaya Rajapakse News)

श्रीलंकेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या जनक्षोभामुळे राजपक्षे यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानातून पळ काढावा लागला होता. आंदोलकांनी राजधानीतील तीन मुख्य इमारती राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान, टेम्पल ट्रीज यावर कब्जा केला आहे. दरम्यान, 1948 मध्ये श्रीलंकेला स्वतंत्र मिळालं. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT