Dhanush political entry rumours after Thalapathy Vijay saam tv
देश विदेश

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Dhanush political Entry: थलपती विजय यांच्या राजकीय यशानंतर अभिनेता धनुषच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगलीय. धनुषच्या चाहतावर्गाच्या संघटनेचं नाव बदलल्याने चर्चांना उधाण आलंय.

Bharat Jadhav

  • दक्षिण भारतातील राजकारणात अभिनेत्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा

  • थलपती विजय यांच्या राजकीय यशानंतर धनुषच्या संभाव्य राजकीय प्रवेशाकडे लक्ष

  • धनुषच्या राजकीय प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दक्षिण भारताच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील राजकारणात सिनेसृष्टीतील अभिनेत्याचा प्रभाव दिसून येतो. अनेक अभिनेत्यांनी राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आंध्र प्रदेशातील उपमुख्यमंत्री पवन कल्याण, कमल हसन, मुख्यमंत्री विजय यांनी राजकारणात जोरदार एंट्री घेतली.

तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय थलपती यांनी तमिळनाडूमध्ये प्रस्थापितांनी पराभूत करत निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. आता चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता राजकारणआत येणार असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता दुसरं तिसरं कोणी नसून धनुष आहे.

धनुषने रविवारी आपल्या अधिकृत फॅन क्लबमधील 3,000 हून अधिक महिला पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची भेट घेतली. या घटनेवरून अभिनेता धनुष याच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय. काही दिवसांपूर्वीच त्याच्या फॅन क्लबचे नाव बदलून ‘धनुष नरपणी इयक्कम’ (धनुष कल्याणकारी चळवळ) असं केलंय. या बदलामुळे धनुष राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. दरम्यान त्याने अद्याप राजकीय प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये. परंतु तो राजकारणात येण्यासाठी चाचपणी करत असल्याचं म्हटलं जातंय.

या घडामोडींची माहिती असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, धनुषची ही बैठक चेन्नईच्या बाहेरील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या परिसरात धनुषचे बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले. धनुषच्या फॅन क्लबच्या नावात आणि संघटनात्मक रचनेत बदल करण्यास 14 ऑक्टोबर रोजी कोइम्बतूर येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यावेळी संघटनेचा नवीन लोगोही प्रसिद्ध करण्यात आला.

या लोगोमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची गोलाकार किनार असून मध्यभागी मोठा लाल तारा आहे. या ताऱ्याच्या आत धनुषचे हात जोडून अभिवादन करतानाचे छायाचित्र आहेत. लोगोवरील तमिळ मजकुरातून या संघटनेची ओळख कल्याणकारी चळवळ म्हणून करण्यात आलीय. फॅन क्लबचे कल्याणकारी संघटनेत रूपांतर झाल्यामुळे धनुष भविष्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सक्रिय होणार का, असे तर्क काढले जात आहेत.

याआधी २७जुलै रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात धनुषने आपल्या चाहत्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. चाहत्यांनी केवळ चित्रपट आणि संगीत कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काम करावे असे आवाहन केले होते. चाहत्यांची मोठी उपस्थिती पाहून त्याने त्यांच्या एकजुटीचे महत्त्वही अधोरेखित केले होते. मात्र, या एकजुटीला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही त्याने म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT