BJP Leader Murder 
देश विदेश

BJP Leader Murder: भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या, होळीच्या दिवशीच घेतला जीव, नेमका वाद काय?

Sonipat Crime News : हरियाणामधील सोनीपत येथील स्थानिक भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Namdeo Kumbhar

Sonipat BJP Leader Murder : होळीच्या दिवशीच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये शुक्रवारी रात्री जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. सोनीपत पोलिसांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मृत व्यक्तीचे नाव सुरेंद्र जवाहर असल्याचे समोर आलेय. सुरेंद्र हे सोनीपत येथील मुंडलाना मंडळाचे भाजप अध्यक्ष होते.

नेमकं प्रकरण काय आहे ?

सोनीपत पोलिसांनी सांगितले की, १४ मार्च रोजी सोनीपतमध्ये जमिनीच्या वादातून भाजप नेते सुरेंद्र जवाहरा यांची शेजाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली. गोहाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) ऋषीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोनू असे आहे. ही घटना सोनीपत जिल्ह्यातील जवाहरा गावात घडली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार पीडितेने आरोपीच्या कुटुंबातील नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला होता. जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने सुरेंद्र यांची गोळ्य झाडून हत्या केली.

गोळ्या झाडल्यानंतर आरोपी फरार

सुरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी मोनू फरार झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सुरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सुरेंद्र यांची हत्या झाल्यानंतर परिसरातील वातावरण चिघळले असून नागरिक प्रचंड तणावात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

आरोपीला पकडण्यासाठी पथके -

सुरेंद्र यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी रात्री उशीरा मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत आरोपी मोनू फरार झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT