Soniya Gandhi Saam Tv
देश विदेश

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाचा संसर्ग, बैठकीत सहभागी नेतेही बाधित

सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना कोरोनाचा संसर्ग (Corona) झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी झालेल्या अन्य काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. या बैठकीदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. काँग्रेस प्रवक्तेत रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. (Soniya Gandhi Latest News)

दरम्यान, सोनिया गांधी यांनी स्वत: ला आयसोलेट केली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच बैठकीला हजर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. सोनिया यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे.

बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालं आहे.

सोनिया गांधींना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयानं (ED) बुधवारी सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावले. या प्रकरणाची चौकशी तपास संस्थेने २०१५ मध्येच बंद केली होती. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सवर (ED Summons) काँग्रेसने (Congress) टीका केली आहे. भाजपकडून आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनीही भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. १९४२ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळी इंग्रजांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आज मोदी सरकारदेखील तेच करत आहे. त्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे, असे सूरजेवाला म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT