सोनम वांगचुक यांनी 23 दिवसांनंतर उपोषण मागे घेतले.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि CJP शिष्टमंडळामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
सरकारने संवादाची भूमिका स्वीकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे CJP च्या नेत्यांनी सांगितलंय.
दरम्यान रविवारी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सांगितले की, जर राजकीय पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचं आश्वासन दिलंय. ते झाल तरच वांगचुक त्यांचे उपोषण मागे घेतील. तसेच 'चलो संसद' (संसदेकडे कूच) ही मोहीम पूर्णपणे शांततापूर्ण असावी, अशी वांगचुक यांची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोमवारी केंद्र सरकारने CJP सोबत चर्चा सुरू केली. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि नेते आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आपल्या मागण्या स्पष्ट आहेत, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी 'सीजेपी'ची भूमिका असल्याचं सांगितलंय.
सीजेपीचे शिष्टमंडळ तसेच जे.पी.नड्डा यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर सौरव दास यांनी आपल्या सोशल मीडियावर बैठकीत काय झालं, याविषयी माहिती दिली. दोन महिने वाट पाहून जे. पी. नड्डा यांच्याशी फक्त दहा मिनिटेच भेट होऊ शकली, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आम्ही आमच्या मागण्यांचे पत्र त्यांना दिलंय. आम्ही अंतर्गत या मागण्यांवर चर्चा करू, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्येचेही त्यांनी सांगितलं.
तसेच, सोनम वांगचूक यांची लवकरात लवकर सुटका करावी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्याही सीजेपीने केल्या आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आपले उपोषण सोडले होते. 'ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'च्या (AISA) तीन सदस्यांनीही त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राज्यसभा खासदार मनोज झा आणि अभिनेते प्रकाश राज यांनी आंदोलनस्थळी या कार्यकर्त्यांना पेये देऊन त्यांचे उपोषण सोडण्यास मदत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.