madhyapradesh crime news saam tv
देश विदेश

Shocking News: पोटच्या लेकाचं नशेत संतापजनक कृत्य, जन्मदात्या आईची हत्या करुन मृतदेह घरातच पुरण्याचा प्रयत्न, पण...

Son kills Mother Drug Addiction: मध्यप्रदेशच्या नालंदा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. मुलाने नशेच्या धुंदीत असताना आपल्या आईचा जीव घेऊन घरातच मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला.

Saam Tv

मध्यप्रदेश : नालंदा जिल्ह्यातील राजगीर तालुक्यात एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. सबलपूर गावात एका तरुणाने आपल्या ७५ वर्षीय जन्मदात्या आईची गळा दाबून निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातच मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला.संबंधित आरोपी अजीत कुमार (वय ३५) हा नेहमी नशेच्या आहारी असायचा. त्याने आपल्या आईचा खून करून घरातच सुमारे दोन फूट खोल खड्डा खोदला.

मात्र आजूबाजूच्या लोकांना या सगळ्याची चाहुल लागल्याने त्यांनी लगेचच घरच्या दिशेने धाव घेतली यावेळी संपूर्ण घटनास्थळी गोंधळ उडाला होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी आरोपीला पकडले आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी रमन कुमार आणि दरोगा संजीव कुमार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अजीत कुमारला अटक केली असून हत्या करण्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बिहार शरीफ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजीत कुमार हा चार भावांपैकी सर्वात लहान असून तो आई-वडिलांसोबत राहत होता. त्याचे इतर भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी आपाआपल्या व्यवसायात गुंतलेले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अजीत नेहमी गांजाचे सेवन करत नशेत राहायचा. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला देखील मारहाण केली होती. त्यामुळे तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन गेला.

आईवर आधीही केले होते अत्याचार

स्थानिकांच्या मतानुसार, अजीतने यापूर्वीही आईला मारहाण करून तिचा हात मोडला होता. सततच्या नशेमुळे त्याच्या वर्तनात हिंसक प्रवृत्ती वाढली होती. अखेर त्याने आपल्या आईची गळा दाबून हत्या केली. मात्र वडील मोहन उपाध्याय यांच्या आरडाओरडमुळे आजूबाजूच्या लोकांनी हस्तक्षेप केला आणि हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 300 स्टेडियम उभारायचे आहे - नितीन गडकरी

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

SCROLL FOR NEXT