Smruti Irani  Saam Tv
देश विदेश

Smriti Irani : 'मोदींवरील टीका भोवली', स्मृती इराणींचा राहुल गांधीवर हल्लाबोल

Smriti Irani On Rahul Gandhi: तीन राज्यात भाजप तर एक राज्यात काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप बाजी मारताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर निशाना साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smriti Irani On Rahul Gandhi:

देशभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आज चार राज्यांची मतमोजणी सुरु आहे. तीन राज्यात भाजप तर एक राज्यात काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप बाजी मारताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर निशाना साधला आहे.

'जी टिप्पणी राहुल गांधी आणि गांधी घराणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली, ती टिप्पणी गांधी कुटुंबियांना महागात पडली आहे. जनतेला माहित आहे की, विकासाच्या कामांसाठी फक्त नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णत्वास उतरले आहे. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा मोदी मॅजिकच्या माध्यमातून निकाल आपल्यासमोर ठेवला आहे', असं म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे.

स्मृती इराणी यांनी सकाळी एक ट्वीट करत काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत एक अकेला सब पे भारी असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओत मोदी म्हणतात की, देश बघतोय एक माणूस किती जणांवर भारी पडला आहे. या लोकांमध्ये (विरोधी पक्ष) हिंमत नाहीये. ते नेहमी स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT