Smriti Irani on Mahadev Betting App Smriti Irani Speech- Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Election 2023: काँग्रेस पक्ष छत्तीसगडमध्ये दुबई हवालाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे, स्मृती इराणी यांचा आरोप

Satish Kengar

Smriti Irani On Mahadev Betting App:

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचे दौरे सुरू आहेत. यातच प्रचारासाठी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज धमतरी येथे पोहोचल्या. यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, ''छत्तीसगडमधील काँग्रेस पक्ष दुबईतील हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे, याने मला धक्का बसला आहे. काल रात्री महादेव अॅप चालवणाऱ्या व्यक्तीने भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपयांची लाच दिल्याचा खुलासा केला. त्याच्याकडे पुरावे असल्याचेही त्या व्यक्तीने म्हटले आहे.''

इराणी पुढे म्हणाल्या की, ''भूपेश बघेलची सहकारी सौम्या जी सध्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहे, हे छत्तीसगडच्या प्रत्येक मुलाला माहीत आहे. आणखी एका पत्रकाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते भूपेश बघेल यांना ढेबर कुटुंबातील संबंधांबद्दल विचारत आहेत. हेच कुटुंब दारू घोटाळ्यात अडकले आहे. भूपेश जी ज्यांना ओळखतात, त्यांनी दारूच्या माध्यमातून राज्यात 2000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी छत्तीसगडच्या कोंडागाव विधानसभा मतदारसंघात रविवारी एका सभेला संबोधित करताना मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, ''आतापर्यंत रिमोट इटलीचा असल्याचे सांगितले जात होते, पण आता रिमोट दुबईतही असल्याचे समोर आले आहे.'' (Latest Marathi News)

महादेव अॅप प्रकरणातील आरोपींचा व्हिडीओ भाजपने केला शेअर

दरम्यान, महादेव अॅप प्रकरणी भाजपने रविवारी एक व्हिडीओ शेअर करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील एक आरोपी शुभम सोनी याचा हा व्हिडीओ असल्याचा दावा भाजपने केला असून त्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे.

या व्हिडीओमध्ये सोनी याने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. मात्र छत्तीसगडमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसने हा व्हिडीओ भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT