Car Accident 
देश विदेश

Car Accident : कार डिव्हायडरला धडकली अन् कोळसा झाला, ६ जणांचा जिवंत जळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये भीषण कार अपघात झाला आहे. भरधाव कार डिव्हायडर आणि विजेच्या खांबाला धडकून दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतल्याने आत अडकलेल्या सहा जणांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Car Accident Death Toll : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यात भरधाव कारमध्येच जिवंत जळून मृत्यू झाला. एका भरधाव कारचा भीषण अपघात होऊन ती डिव्हायडर आणि विजेच्या खांबाला धडकली. टक्कर इतकी जोरदार होती की, काही कळण्याच्या आतच कारला भीषण आग लागली. या जळालेल्या कारमध्ये अडकल्यामुळे सहा जणांचा जिवंत जळून जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील जिंद परिसरातील एक कुटुंब कारने हरिद्वारच्या दिशेने चालले होते. मुजफ्फरनगरमधील हायवेवरून जात असताना भरधाव कार अचानक अनियंत्रित झाली. कारचा वेग जास्त असल्यामुळे ती थेट रस्त्यावरील डिव्हायडर आणि विजेच्या खांबाला जाऊन धडकली आणि दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली.

टक्कर होताच कारमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीने काही सेकंदांतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली. कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या लोटात सापडून कारमधील सहाही जणांचा तडपडून जिवंत मृत्यू झाला.

अपघात आणि आगीचा भडका उडालेला पाहून मार्गावरील काही नागरिकांनी आणि वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, आगीचे लोळ एवढे भयानक होते की कोणालाही कारच्या जवळ जाणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बरीच मेहनत करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत सर्व जण जळून खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजच्या रूग्णांनी नारळ पाणी प्यावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ८व्या वेतन आयोगात लाखोंची थकबाकी मिळण्याची शक्यता, वाचा नवीन अपडेट

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक

Dental Care : मोत्यासारखी चमक अन् मजबूत दात, घरच्या घरी बनवा केमिकल-फ्री हर्बल टूथपेस्ट

Gold Rate : लक्ष्मीपूजनानंतर सराफा बाजारात उलथापालथ! सोन्याच्या दरात प्रतितोळा १०३० रुपयांचा बदल; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT