Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: होळी साजरी करायला जाताना काळाचा घाला, बसची कारला जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Car And Truck Accident: होळीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले. यमुना एक्स्प्रेस वेवर ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • होळी साजरी करण्यासाठी जात असताना भीषण अपघात

  • यमुना एक्सप्रेसवेवर बस-कारची जोरदार धडक

  • ६ जणांचा जागीच मृत्यू, ६ जण गंभीर जखमी.

  • मृतांमध्ये ३ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये होळीच्या दिवशी भयंकर अपघात झाला. मंगळवारी पहाटे यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. प्रवासी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. सदाबाद पोलिस स्टेशन परिसरातील हरिया गढी गावाजवळ पहाटे ४:२० च्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव डबल डेकर स्लीपर बसने कारला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, इको व्हॅनमधून एकूण १३ जण प्रवास करत होते. हे सर्वजण दिल्लीच्या प्रेमनगर भागातील रहिवासी होते आणि होळी साजरी करण्यासाठी राजस्थानमधील धोलपूर येथे जात होते. होळी साजरी करण्यासाठी जाताना वाटेतच काळाने घाला घातला. नोएडाहून गोरखपूरला जाणाऱ्या डबल डेकर स्लीपर बसने इको व्हॅनला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की व्हॅनचा चक्काचूर झाला. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या भीषण अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. जखमींमध्ये तीन मुलं, दोन पुरुष आणि एका महिलाचा समावेश आहे. गंभीर जखमी मुलांना उपचारासाठी आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

दोन मुलांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे असे डॉक्टरांनी सांगितले. अपघातामध्ये वाहन चालक सुदैवाने बचावला. पोलिसांनी बस चालाकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातानंतर यमुना एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आता वाहतूक पूर्ववत केली आहे. पोलिस या अपघाताच तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : विशालसोबत ब्रेकअप; राखीशी बोलताना रुचिता चक्कर येऊन पडली, बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय तरी काय?

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र ATS कडून मुंबईत तीन ठिकाणी छापे

Dry Skin Makeup Tips: ड्राय त्वचेवर मेकअप करताना कोणत्या चुका करु नयेत? कसा करावा परफेक्ट मेकअप

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार; राज्य सरकारचा मास्टर प्लान

Eknath Shinde: दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक मायदेशी परतणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था

SCROLL FOR NEXT