Sikkim Flood ANI
देश विदेश

Sikkim Flood: सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरात वाहून गेलेल्या २३ पैकी १ जवान सापडला, आतापर्यंत ८ नागरिकांचा मृत्यू

Sikkim Flood: सिक्कीममध्ये मंगळवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार माजला आहे.

Vishal Gangurde

Sikkim Flood News:

सिक्कीममध्ये मंगळवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार माजला आहे. सिक्कीममध्ये तीस्ता नदीला पूर आल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर महापुरात वाहून गेलेल्या २३ जवानांपैकी १ जवान सापडला आहे. तर या महापुरात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

'न्यूज18'ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महापूर आला आहे. या महापुरात अनेक वाहने पाण्यात बुडाली. तसेच लष्कराचे २३ जवान वाहून गेले, त्यातील एक जवान सापडला आहे. या जवानाची तब्येत आता नाजूक असल्याची बोललं जातंय. सध्या महापुरात वाहून गेलेल्या २२ जवानांचा शोध सुरू आहे.

सिक्कीमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या महापुरात २२ जवानांसहित एकूण ४८ जण बेपत्ता आहेत.

सिक्कीममधील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, 'मंगळवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या महापुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे'.

सिक्कीम सरकारने महापुरामुळे आपत्ती घोषित केली आहे. या महापुरामुळे चुंगथांग धरणातून पाणी सोडल्याने तलावातील पाण्याची पातळी देखील १५ ते २० फुटांनी वाढली आहे. अनेक वाहने चिखलात अडकली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सिक्कीमचे मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी महापुरामुळे झालेल्या नुकासानीचा आढावा घेतला. पी एस तमांग यांनी सिंगताम येथील भागाला भेट दिली. मुख्यमंत्री तमांग यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांना महापुरामुळे झालेल्या स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

'आपल्यासाठी सध्या मोठं आव्हान आहे. या घटनेमुळे प्रभावित झालेले नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी महापुरावर दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT