Rajasthan Crime News Saam TV
देश विदेश

Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती; पुतण्याने काकीची हत्या करून केले १० तुकडे

एकूण १० तुकडे केल्यावर रात्रीच्या अंधारात त्याने हे तुकडे जंगलात फेकून दिले.

साम टिव्ही ब्युरो

Rajasthan Crime News: श्रद्धा वालकरच्या हत्येने सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. निर्घृण पद्धतीने अफताबने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. अशात हे प्रकरण थोडं शांत नाही होत तोच या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र यावेळी कोणत्या प्रियकराने नाही तर चक्क एका पुतण्याने त्याच्या विधवा काकीची हत्या केली केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा देशात संतापाची लाट उसळली आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अनुज शर्मा असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या विधवा काकीची श्रद्धा प्रमाणे हत्या केली आहे. त्याने आधी काकीच्या डोक्यात हातोडा मारला. यामुळे काकीचा जागीच जीव गेला. काकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने लगेच त्यांच्या शरीराचे १० तुकडे केले. तसेच हे तुकडे त्याने जंगलात फेकून दिले, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सदर घटनेत आपण पकडले जाऊ नये यासाठी त्याने एक सापळा रचला होता. अनुजने केलेल्या गुन्ह्यात त्याने सर्व पुरावे सफाईने मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अनुजचा खरा चेहरा समोर आणला. पोलिसांना काकीच्या शरीराचे काही तुकडे सापडले आहेत. सदर घटनेत पोलिसांनी अनुजला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

मार्बल कटरने शरीराचे १० तुकडे

अनुजने काकीची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये नेला. त्यानंतर त्याने मार्बल कटर घेऊन मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरूवात केली. एकूण १० तुकडे केल्यावर रात्रीच्या अंधारात त्याने हे तुकडे जंगलात फेकून दिले. काकी आणि अनुज हे दोघेच एकत्र राहत होते. काकीचा एक मुलगा परदेशात आहे. तसेच त्यांच्या दोन्ही मुली सासरी आहेत. त्यामुळे काकी आणि अनुज एकत्र राहत होते.

हत्येमागचं कारण काय?

काकीचा एक मुलगा परदेशी असल्याने तो घर खर्चासाठी पैसे पाठवत होता. त्यामुळे अनुजचा पूर्ण संभाळ काकी करत होती. मात्र काकी सतत त्याला कामावरून ओरडायची. त्याने काही चूक केली असल्यास त्याला दम द्यायची. आपल्यावर ओरडणे अनुजला अजिबात मान्य नव्हते. त्याला काकीचा खूप राग येत होता. ११ डिसेंबर रोजी त्याने दिल्लीला जाण्यासाठी काकीला पैसे मागितले. मात्र काकीने पैसे दिले नाहीत आणि दिल्लीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रागाच्या भरात काकीची हत्या केली.

रक्ताचे डाग पुसताना पाहिले बहिणीने

अनुजने कोणाला संशय येऊनये यासाठी काकीच्या मुलींना फोन केला आणि काकी बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून बहिण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी गेली. त्यावेळी तिने पाहिले की, अनुज बाथरूममध्ये रक्ताचे डाग पुसत होता. रक्त पाहून बहिणीने (Sister) घाबरून त्याला या बाबत विचारले असता त्याच्या नाकाची नस फाटल्याचे त्याने सांगितले. मात्र तिला संशय आल्याने तिने दुसऱ्या बहिणीला याची माहिती दिली त्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिममध्ये तीन वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे ७ पदार्थ करा आजपासूनच बंद

Valentine Day Love Letter: 'जाने तू या जाने ना; नया प्यार है, नया इंतज़ार'

Daily Skin Care: दररोज फक्त 5 मिनिटं करा स्किन केअर , दिवसभर चेहरा राहील फ्रेश

Dombivli Crime: माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने पोरीच्या वडिलांना मारलं, मद्यधुंद तरुणांचा हैदोस; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT