Shooting at copenhagen Mall in Denmark  Saam Tv
देश विदेश

डेन्मार्कमधील कोपनहेगन मॉलमध्ये गोळीबार; ७ ठार, हल्लेखोरांना अटक

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला.

साम वृत्तसंथा

कोपनहेगन : डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय डॅनिश तरुणाला अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी (Police) गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. डेन्मार्क पोलीसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असू शकतो. या घटनेत आणखी काही लोक सामील आहेत की नाही याची सध्या तरी माहिती नाही. पुढील तपास सुरू आहे.

ही घटना कोपनहेगन येथील फील्ड्स शॉपिंग मॉलमध्ये घडली. काल सुट्ट्या असल्यामुळे अनेक लोक शॉपिंग मॉलमध्ये उपस्थित होते. यादरम्यान, अचानक गोळीबार झाला. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि लोकांनी बाहेर धाव घेतली.

'आम्ही पुढील तपास करत आहे. ही घटना दहशतवादी घटना आहे हे आम्ही नाकारू शकत नाही.' अशी माहिती पोलिसांनी दिली. या मॉलमध्ये पोलिसांनी तैनात करण्यात आले आहे.

कोपनहेगनमध्ये यंदाच्या टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा हल्ला झाला. टूर आयोजकांनी एक निवेदन जारी करून सहानुभूती व्यक्त केली आहे.

घटनास्थळावरील फोटोंमध्ये मुले आणि त्यांचे पालक इमारतीतून पळून जाताना आणि रुग्णवाहिका कर्मचारी लोकांना स्ट्रेचरवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हा हल्ला झाला तेव्हा या मॉलमधून १०० हून अधिक लोकांनी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT