Shocking Video Saam Tv
देश विदेश

Shocking Video: पती-पत्नीचा भररस्त्यावर वाद, रागाच्या भरात पत्नी ब्रिजवरून उडी घ्यायला गेली अन्....

Husband Wife Fight: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. जिथे भररस्त्यात नवरा- बायकोमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने असं काही केलं की प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

Viral Video: शहरातल्या मध्यवर्ती भागात एका नवरा-बायकोमध्ये झालेल्या जोरदार वादाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दोघांमध्ये रस्त्यावरच मोठा वाद झाला आणि या वादाचा शेवट इतका गंभीर झाला की, रागाच्या भरात पत्नीने थेट पुलावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार अनेकांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

व्हायरल होत असलेला प्रकार व्हिडिओमध्ये(Video) कैद झालेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुलावर पती-पत्नी बाईकवरुन जात असतात. अचानक त्यांच्या वाद सुरु होतो,म्हणून ते पुलावरच बाईक साईटला थांबवतात आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू वाद शांत होण्याच्या ऐवजी वाढू लागतो.

पती-पत्नीमधील वाद पाहता पाहता अतिशय गंभीर भुमिका घेतो. दरम्यान ती महिला अचानक पळत जाऊन पुलावरुन उडी मारत स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न करते. पण वेळेवर तिचा नवरा तिला पाठी घेचतो आणि एक कानाखाली मारत खाली बसवतो. सर्व प्रकार लांबून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

नेमका हा प्रकार कुठल्या शहरातील आहे आणि पती-पत्नीमध्ये वाद कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले नाही. हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral) झालेला आहे. त्यावर नेटकरी वर्गातून संतापजनक आणि हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT