Rat Found In Panipuri Saam Tv
देश विदेश

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

Rat Found In Panipuri: पाणीपुरीमध्ये जिवंत उंदीर आढळून आल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील रस्त्यावरील स्टॉलवर पाणीपुरी खाणं बंद कराल.

Priya More

Summary -

  • पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत उंदीर आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल

  • फूड ब्लॉगरने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला

  • हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • याआधीही महाराष्ट्रात पाणीपुरीमुळे लोक आजारी पडल्याच्या घटना

गिरीश निकम, साम टीव्ही

आता एक बातमी पाणीपुरीप्रेमींसाठी.तुम्ही अगदी मिटक्या मारत खाणा-या पाणीपुरीच्या गोड पाण्यात चक्क जिवंत उंदीर आढळलाय. कुठे घडलाय हा किळसवाणा प्रकार ? पाहूयात या रिपोर्टमधून...

घरात कुणाला पाणीपुरी आवडत नाही, असं होणारच नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण पाणीपुरीचे शौकीन असतात. नवीन जनरेशन तर कुठे चांगली खट्टी-मिठी पाणीपुरी मिळते हे शोधून काढत असतं. हे सगळं ठिक. पण आता पाणीपुरी खाताना सावधान राहा. कारण आता आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत. तो पाहिल्यावर तुम्ही कदाचित पाणीपुरी खायला धजावणार नाहीत. जरा हा व्हिडीओ पाहा...

पाणीपुरीची चव लज्जतदार करणाऱ्या या पाणी पुरीच्या पाण्यात चक्क जिवंत उंदीर आढळलाय. हो हे खरं आहे. पाणीपुरीसाठी एका स्टीलच्या टाकीत गोड पाण्यासाठी चमचा टाकला आणि त्यातून चक्क उंदीरानं बाहेर उडी मारली . एका फूड ब्लॉगरने हा धक्कादायक प्रकार जगासमोर आणलाय.

पाणीपुरीबाबतचा हा किळसवाणा प्रकार काही पहिलाच नाही. नवी मुंबईतील ऐरोली मध्ये एका दुकानात पाणीपुरी बनवण्यासाठी चक्क शौचालयातील नळातील पाण्याचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. 2024 मध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आठवड्याच्या बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने ८० हून अधिक ग्रामस्थ आजारी पडले होते.

तर गेल्या वर्षी नांदेडमधील विष्णुपूरी भागात रस्त्यावरील पाणीपुरी खाल्ल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. अस्वच्छतेमुळेच कधीकधी ही पाणीपुरी जीवघेणी ठरत असते. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पंजाबमधील फिरोजपूरमधील आहे.

त्यामुळे जिथे स्वच्छता आणि पुरेशी काळजी घेतली जाते. तसेच ज्या दुकानाच्या गुणवतेबद्दल तुम्हाला माहिती आहे अशाच ठिकाणी जा. आणि अगदी बिनधास्त मिटक्या मारत पाणीपुरी खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या ११८ घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार, अर्ज कुठे कराल?

Beed: बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दगडाला बांधून कॉप्या टाकतानाचा VIDEO व्हायरल

वर्ल्ड कपमधील मिस्ट्री गर्ल कोण? फोटो पाहून लाखो फॉलोअर्स पडले प्रेमात? VIDEO

SCROLL FOR NEXT