Twist in Honeymoon Tragedy: Sonam Raghuvanshi Arrested for Husband's Murder, 4 Held Across Two States Saam TV Marathi News Update
देश विदेश

Honeymoon Turns Horror: सोनम बेवफा है! राजा रघुवंशी हत्या प्रकरणी ट्विस्ट, पत्नी सोनमला बेड्या, नवऱ्याला मारण्यासाठी दिली सुपारी

Details of the Raja Raghuvanshi murder investigation : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हनीमून दरम्यान झालेल्या या हत्येप्रकरणी सोनमसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Who killed Raja Raghuvanshi in Meghalaya? : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता हनिमून जोडपे प्रकरणात तुम्ही विचारही केला नसेल असा ट्विस्ट आला आहे. राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रघुवंशी बेपत्ता प्रकरणात दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत होते, मात्र आता या प्रकरणात पत्नीचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

राजा रघुवंशी याची हत्या पत्नी सोनम हिनेच घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पत्नी सोमन रघुवंशी ( Sonam Raghuvanshi) आणि तिच्या ३ साथीदारांना उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोनमने नवऱ्याला संपवण्यासाठी ३ जणांना सुपारी (Why did Sonam plan her husband’s murder on their honeymoon?) दिल्याचे तपासातून समोर आले आहे. मेघालय आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मिळून कारवाई केली असून, सीबीआयकडून तपास सुरू आहे.

इंदूर येथील नवविवाहित जोडप्याच्या मेघालयातील हनीमूनदरम्यान घडलेल्या हत्याकांडाने देशभर खळबळ (Latest updates in Sonam Raghuvanshi arrest case) उडाली होती. मेघालयच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) आय. नोंग्रंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी याच्या हत्येमागे त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिचा हात आहे. सोनमने आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी देऊन तीन हल्लेखोरांना पैसे दिले होते. या प्रकरणी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला. पोलिसांकडून सोनमच्या या कृत्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

राजा आणि सोनम ११ मे रोजी लग्नबंधनात अडकले होते. मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला होता. २० मे रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले. मात्र, २३ मे रोजी दोघेही बेपत्ता (Honeymoon turns into horror: Meghalaya murder case) झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह शोहरा परिसरातील एका खोल दरीत सापडला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस ठाण्यात शरण आली. तिच्यासह मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना रात्रीच्या छापेमारीत अटक करण्यात आली. डीजीपी नोंग्रंग यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींनी सोनमने हत्या करण्यासाठी त्यांना पैसे दिल्याची कबुली दिली आहे. मध्य प्रदेशात इतर संशयितांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT