Bengaluru Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Bengaluru Crime: बंगळुरूतील इन्फोसिस कंपनीमध्ये भयंकर घटना घडली. इंजिनीअर तरुण वॉशरूममध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे गुपचूप व्हिडीओ काढायचा. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

बंगळुरूमध्ये इन्फोसिस कंपनीच्या इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली. वॉशरूममध्ये जाऊन महिला सहकाऱ्याचा व्हिडीओ काढणाऱ्या इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली. नागेश स्वप्निल माळी असं आरोपीचे नाव आहे. हा तरुण इन्फोसिस कंपनीमध्ये सिनिअर असोसिएट म्हणून काम करतो. या तरुणाच्या या घृणास्पद कृत्यामुळे कंपनीत खळबळ उडाली.

इंजिनीअरवर असा आरोप करण्यात आला आहे की, महिला कर्मचारी वॉशरूममध्ये गेली असताना तिला शेजारच्या वॉशरूममध्ये काही तरी संशयास्पद हालचाली दिसल्या. तिने डोकावून पाहिले असता आरोपी नागेश गुपचूप व्हिडीओ बनवत होता. यानंतर तिने आरडाओरडा केला. महिला कर्मचाऱ्याचा आवाज ऐकून कंपनीतील इतर कर्मचारी तिथे आले आणि नागेशला रंगेहाथ पकडले.

त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आरोपी नागेशचा फोन तपासला असता त्यात त्यांना महिला कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ आढळला. महिला कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आरोपीने यापूर्वी अनेक महिलांचे व्हिडिओ बनवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

याआधी अयोध्येतही असाच एक प्रकार समोर आला होता. येथे एका गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याने एका महिलेला आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या महिलेला देखील काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तिला कोणाची तरी सावली दिसली तेव्हा हा धक्कादायक प्रकरण उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT