Shoking Viral Video 
देश विदेश

Fire Viral Video: सिगरेट पेटवताच घडला मोठा अनर्थ...; दोन मिनिटांची मजा अन् जन्मभराची मिळाली सजा...

Shoking video : सिगरेटचं व्यसन एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

cigarette viral video : अनेक व्यक्तींना धुम्रपान करण्याची सवय असते. या व्यसनामुळे आपल्या जिवाला धोका असतो हे माहीत असूनही बऱ्याच व्यक्ती धूम्रपान करतात. तरुणाईमध्ये सिगरेट, तंबाखू, पान अशी व्यसने दिवसेंदिवस वाढत आसल्याचं दिसत आहे. सिगरेटचं व्यसन एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. (Shoking video)

सिगरेट पिल्याने फुफ्फुसांचे आजार होतात, कॅन्सर होतो. त्यामुळे अनेक व्यक्ती दगावतात. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कॅन्सर किंवा फुफुसांचा आजार न होताच या व्यक्तीचा मृत्यू झालाय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका दुकानात दोन तरुण आणि दुकान मालक उभा आहे. यातील एक तरुण सिगरेट विकत घेतो.

सिगरेट विकत घेतल्यानंतर तो तिथेच सिगरेट पीत असतो. लाईटरच्या सहाय्याने तो सिगरेट पेटवतो तेव्हा मोठा अनर्थ घडतो. त्याच्या सिगरेटला आग लागते. पुढेही आग सगळीकडे पसरते. बघता बघता आग (Fire) तरुणाच्या संपूर्ण शरीरावर पेट घेते. आगीमुळे मोठा स्फोट होऊन या दुकानाला देखील आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित घटनेमध्ये दुकानातील इतर दोन व्यक्ती देखील होरपळले आहेत. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आतापर्यंत 3 मिलियनहून अधिक व्हुव्ज या व्हिडिओला आले आहेत. धूम्रपान करताना देखील स्वतःची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे या व्हिडिओमधून समजते.

धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. तंबाखू, सिगरेट यांच्या पॅकेटवर देखील धूम्रपान करणे किती धोक्याचे आहे हे लिहिलेले असते. सरकार मार्फत देखील धूम्रपान करूनये यासाठी जनजागृती केली जाते. मात्र जगभरात लाखो व्यक्ती विविध व्यसनाच्या आहारी गेलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT