French President Wife Brigitte Slapped Him 
देश विदेश

French President: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गृहलक्ष्मी संतापली; प्लेनचा दरवाजा उघडला अन् सर्वांसमोरच कानशिलात लगावली| Video Viral

French President Wife Brigitte Slapped Him: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल आणि ब्रिजिट मॅक्रॉनची प्रेमकहाणी जगभर प्रसिद्ध आहे. मॅक्रॉनपेक्षा २४ वर्षांनी मोठी असलेली ब्रिजिट त्याची शाळेची शिक्षिका होती. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

इमॅन्युएल मॅक्रॉनची पत्नी त्याच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठी आहे. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने आपल्या पत्नीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. परंतु मॅक्रॉनच्या कुटुंबीयांना हे नाते अजिबात मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांचे लग्न खूपच वादग्रस्त ठरलं. समाजानेही त्यांच्या लग्नाला खूप विरोध केला होता. दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनने चपराक लागवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ व्हिएतनामची राजधानी हनोई येथील असल्याचे सांगितले जातंय. मॅक्रॉन त्यांच्या पत्नीसह व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. विमानातून उतरताना त्यांची पत्नीने त्यांच्या कानशिलात लगावली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडालीय.

हा व्हायरल व्हिडिओ फ्रान्सचे राष्ट्रपती भवन एलिसी पॅलेसमध्येही चर्चेचा विषय बनला. त्यानंतर एलिसी पॅलेसला या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे लागलंय. हा व्हिडिओ मागील सत्य काय आहे, हे जाणून घेऊ. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पत्नीने खरोखरच सर्वांसमोर चपराक मारली होती की, ती फक्त थट्टा होती? यामागील सत्यता समजून घेऊ.

राष्ट्रपतींना त्यांच्या पत्नीने कानशिलात लगावली

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट हनोईला गेले होते. तेथे ते विमानातून खाली उतरताना दिसत आहेत. ब्रिजिट मॅक्रॉन तिच्या पतीला हाताने ढकलताना किंवा तोंडावर मारताना दिसत आहे. या व्हिडिओ प्रसार माध्यमाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.

यावेळी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन थोडे अस्वस्थ झाल्याचं दिसत आहेत. पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वागत करणाऱ्या शिष्टमंडळाकडे पाहत हात हलवत त्यांना अभिवादन केलं. कदाचित विमानाखाली पत्रकारांची गर्दी आहे आणि कॅमेरे त्याच्यावर केंद्रित आहेत हे त्यांना माहिती असावं. पत्नीनं धक्का दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी एकमेकांचा हात न धरता विमानातून खाली उतरताना दिसले. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, फ्रेंच सरकारने तो व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिले. सुरुवातीला, एलिसी पॅलेसने दावा केला होता की, हा व्हिडिओ एआय वापरून तयार करण्यात आला होता आणि तो बनावट आहे. नंतर, जेव्हा व्हिडिओची सत्यता सिद्ध झाली, तेव्हा राष्ट्रपती भवनाने आपली भूमिका बदलली.

मॅक्रॉनच्या एका जवळच्या सहकाऱ्याने याला "पती-पत्नीमधील विनोद" असे वर्णन केले. फ्रेंच माध्यमांनीही असेच वृत्त दिले. दरम्यान या व्हिडिओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लोकांचे लक्ष वेधून घेतलंय. लोकांनी राष्ट्रपती देखील आपल्या पत्नीपासून सुटू शकत नाहीत. अस म्हणत नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT