Congress Woman Leader’s Obscene Image Circulated Online saam
देश विदेश

धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

Congress Woman Leader’s Obscene Image Circulated Online: गाझियाबादमध्ये महिला काँग्रेस नेत्या यांचा एआय वापरून अश्लील फोटो तयार केला. तसेच सोशल मीडियात व्हायरल केला.

Bhagyashree Kamble

गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो आर्टिफिशियस इंटेलिजेंच वापरून तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण समोर येताच आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. तसेच तपासाला सुरूवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेनं म्हटलं की, त्या गाझियाबादच्या राजकारणात सक्रीय आहेत. माहितीनुसार, या पूर्वी त्यांनी जिल्हास्तरीय काँग्रेस पदाधिकारी म्हणून काम केले आहे. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अजय शर्मा यांनी एक बैठक बोलावली. जिथे मुन्ना बाबू आणि सलीम इदरीसी यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

या घटनेमुळे पीडित महिला नेत्याला मानसिक त्रास झाला. काँग्रेस महिला नेता यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, लोनी येथील रहिवासी सलीम इदरीसी यांनी जाणूनबुजून फोटोमध्ये फेरफार केला. तसेच व्हायरल केला, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पीडित महिलेने गाझियाबाद शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित महिलेनं घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच तपासाला सुरूवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT