Jharkhand News Saam Tv
देश विदेश

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jharkhand News : झारखंडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला मिठाईचं आमिष दाखवत १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे.

Alisha Khedekar

  • झारखंडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार.

  • मिठाईचं आमिष दाखवतं ३०० मीटर लांब झुडपात नेऊन केले अत्याचार.

  • पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात ५ वर्षांच्या मुलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिठाईचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या मुलीला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील जरियागढ गावात बुधवारी ५ वर्षीय चिमुकलीअंगणवाडीत गेली होती. अंगणवाडीतल्या जेवणाच्या सुट्टीत जेवून ती बाहेर गेली असता १५ वर्षीय आरोपीने मिठाई देण्याच्या बहाण्याने तिला हाक मारली. तिला मिठाई दिल्यानंतर अजून मिठाई देतो सांगून आरोपीने तिला ३०० मीटर लांब असलेल्या एका झुडपात नेले. त्या झुडपात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. यानंतर १५ वर्षीय अल्पवयीन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

अंगणवाडी सुटल्यानंतर पीडित चिमुकली घरी आली. तिची आई आजारी असल्याने तिने वडील शेतातून आल्यानंतर सगळी हकीकत वडिलांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीच्या वडिलांनी जरियागढ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने जरियागढ गावात संतापाची लाट उसळली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी आरोपीला कोणती शिक्षा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीसोबत दीराचे अनैतिक संबंध, थोरल्या भावाचा खून केल्यानंतर धाकट्या भावाच्या चेहऱ्यावर क्रूर हसू,'त्या' कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT