Crime News Saam tv
देश विदेश

Shocking: सनकी बॉयफ्रेंड! गर्लफ्रेंडचा गळा चिरला, तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अन् ...

Boyfriend kills Girlfriend over suspicion: नालंदा, बिहारमध्ये संशयाच्या भरात प्रियकराने प्रेयसी पूजाचा खून केला. मृतदेह सुटकेसमध्ये भरून टाकला. आरोपी अटकेत, परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मोहल्ला येथून खळबळजनक हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. फक्त एका संशयामुळे प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. तसेच तिचा मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून नाल्यात फेकून दिला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पूजा कुमारी (वय वर्ष २०) असे मृत तरूणीचे नाव आहे. तर, अमित कुमार (वय वर्ष २५) असे आरोपीचे नाव आहे. चार वर्षांपासून त्याचं अफेअर होतं. मृत तरूणी अस्थान पोलीस स्टेशन परिसरातील ओंडा गावातील रहिवासी आहे. बिहार शरीफमध्ये भाड्याच्या घरात ती राहत होती. तसेच नर्सिंगचं शिक्षण होती.

पूजाच्या कुटुंबाला त्यांच्या रिलेशनशिपबाबत कल्पना होती. त्यांचा अमितवर खूप विश्वास होता. त्याच्या सल्ल्यानुसार, कुटुंबाने पूजाला बिहार शरीफला शिक्षणासाठी पाठवलं. शिक्षणासाठी गेल्यानंतर अमितला पूजावर अधिक संशय घेऊ लागला. तिचे वर्गमित्र खोलीत येऊ लागले. ही बाब अमितला सहन होत नव्हती. यामुळे अमितला पूजाच्या प्रेमावर संशय येऊ लागला. त्याला वाटले की पूजा आता त्याच्यावर प्रेम करत नाही. त्याने प्रेयसी पूजाला मारण्याचा कट रचला.

अमितने प्लॅन रचल्याप्रमाणे बाजारातून एक सुटकेस विकत घेतलं. नंतर पूजाच्या खोलीत गेला. पूजा झोपलेली असताना त्याने धारदार शस्त्राने पूजावर वार केले. नंतर तिचा गळा चिरला आणि मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून नाल्यात फेकून दिलं. पूजाच्या कुटुंबाने आरोपीविरोधात संशय व्यक्त केला. पोलिसांनी अमितच्या खोलीची झडती घेतली असता, आरोपीच्या खोलीतून धारदार हत्यार सापडले.

पोलिसांनी हत्यारे जप्त केले. खोलीत रक्ताचे डागही आढळले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अमितला हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Shivtare: लेक लाडकी जणू मायेचा झरा; आमदार शिवतारेंना मुलीनं दिली किडनी, महाराष्ट्र गहिवरला

Face care: उन्हाळ्यात टॅनिंग घालवून ग्लोईंग आणि चेहऱ्याला थंडावा हवा असेल तर ट्राय करा 'हा' फेस मास्क

Maharashtra Live News Update: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय

Interviews Tips: इंटरव्ह्यू सुरु असताना ऑफर केलेलं पाणी का पिऊ नये? वाचा कारण

Video Viral: पॅरासेलिंगदरम्यान दोरी तुटली आणि....! बागा बीचवर धक्कादायक घटना, व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT