car accident  Saam Tv News
देश विदेश

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

udaipur accident : कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना कारचा अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Saam Tv

उदयपूरमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झालाय

वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या 6 मित्रांपैकी 4 जणांचा जागीच मृत्यू

अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

दोन तरुण गंभीर जखमी झालेत

राजस्थानच्या उदयपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारमध्ये वाढदिवसा साजरा करताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उदयपूरमध्ये मोहम्मद अयान, आदिल कुरैशी,शेर मोहम्मद, गुलाम ख्वाजा, वसीम आणि मोहम्मद कैफ हे अयानचा वाढदिवस साजरा करण्याठी दुचाकी गहान ठेवून कार भाड्याने घेतली होती. या ६ मित्रांनी धावत्या कारमध्येच वाढदिवस साजरा करण्याचा प्लान केला होता.

शेर मोहम्मदने कार १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालवण्यास सुरुवात केली. या कारमध्ये मोठ्या आवजाने गाणे वाजवणे सुरू होते. कार चालवणाऱ्याच्या हातात सिगारेट होती. कारच्या आतच वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्याचदरम्यान कारचा भीषण अपघात झाला.

अपघात झाल्यानंतर कारमध्ये एकच अंधार झाला. कारमधील तरुण जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागले. 'आई मला वाचव. भाऊ मला वाचव. हे अल्लाह मी कारमध्ये अकडलो आहे. मला श्वास घ्यायला देखील अडचण होत आहे, असं कारमधील एक तरुण ओरडत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ४ मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी तरुणांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेहाची ओळख करून ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. कार कोणाची होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahashivratri Upay: महाशिवरात्रीला माता पार्वतीला अर्पण करा 'या' रंगाची साडी, तुमची सर्व संकटे नष्ट होतील

Poha Health Benefits : तुम्ही दररोज नाश्त्याला पोहेच खाल, जाणून घ्या 'हे' ५ जबरदस्त फायदे

BJP vs NCP : भाजप नेत्याचा हत्येचा कट, जयकुमार गोरेंचा दावा, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

दररोज रात्री उशीर जेवत असाल तर शरीरात होऊ लागतात हे बदल

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

SCROLL FOR NEXT