शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली बाजू मांडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज कौल हे युक्तीवाद करत आहेत. कालच्या सुनावणीदरम्यान शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी ठाकरे त्यांचे बहुमत सिद्ध करू शकल नव्हते असा युक्तीवाद केला होता. आजच्या सुनावणीदरम्यान शिंदेंचे वकील काय युक्तीवाद करतात आणि त्यावर सुप्रीम कोर्ट नेमकं काय मत मांडतात हे पाहणं महत्वाचे राहिल....
शिवसेनेकडून नीरज किशन कौल हे युक्तीवाद करत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर सांगितले की, 'राजकीय पक्षाचा पाया लोकसाहीवर अवलंबून आहे. पक्षात पक्षांतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत. ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत.'
नीरज कौल यांनी आज पुन्हा कोर्टासमोर सादीक अली केसचा दाखला दिला. त्यांनी सुनावणीदरम्यान सादीक अली केसमधील काही महत्वाच्या मुद्द्यांचे वाचन केले. 'पक्षात मोठ्या नियुक्त्या केल्या की निवडणूक आयोगाला कळवावं.', असे नीरज कौल यांनी कोर्टासमोर सांगितले.
नीरज कौल यांनी कोर्टात असे देखील सांगितले की,'आमदारांबाबत निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्षांना अधिकार आहेत. कोणत्याही आमदाराने राजीनामा दिला नाही. पक्ष लोकशाही पिरॅमिडचा पाया आहे. राजकीय बदलांमुळे आमदारांना फरक पडत नाही. राजकीय पक्षांचा पाया लोकशाहीवर अवलंबुन असतो. अंतर्गत लोकशाही हा पक्षााठी महत्वाचा मुद्दा आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.