anjay Raut Accuses Amit Shah and EC Over Shiv Sena Symbol Dispute Saam TV marathi
देश विदेश

५,००० कोटींत शिवसेना विकली! आयोग अन् अमित शाहांवर ठाकरेंच्या खासदाराची गंभीर टीका; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Sanjay Raut, Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना संजय राऊत यांनी अमित शाह आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ५,००० कोटी रुपयांना विकल्याच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut ₹5000 crore Shiv Sena allegation : शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी सुरू आहे. आज ठाकरेंकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर आतापर्यंतचा सर्वात मोठा व गंभीर आरोप केला आहे. "गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने ५,००० कोटी रुपयांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना विकले, असा घणाघाती दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आमदार फोडण्यापासून 'सेटिंग'पर्यंत ५ हजार कोटींचा खर्च!

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सत्तांतराच्या संपूर्ण घटनाक्रमावर जोरदार निशाणा साधला. आमदारांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला घेऊन जाणे, तेथील पंचतारांकित व्यवस्था आणि त्यानंतर निवडणूक आयोगातील सेटिंग-बिटिंग... या संपूर्ण प्रक्रियेत जनतेचे तब्बल ५,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत, असा दावा राऊतांनी केला.

आयोगाने दलाली केली

अमित शाह यांच्या 'शेअर मार्केट'मधून शिवसेना हा पक्ष विकला गेला. पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला सहजासहजी मिळालेले नाही, तर त्यासाठी मोठी किंमत मोजली गेली आहे. निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणात एका 'दलाल' किंवा 'एजंट'ची भूमिका बजावली आहे. पक्षाची घटनात्मक रचना आणि आमचे संघटनात्मक बहुमत डावलून निवडणूक आयोगाने पक्ष विकण्याचे काम केले, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

आयोगाने ४ पक्ष विकले -

आयोगाने आतापर्यंत अशाच प्रकारे ४ राजकीय पक्ष विकले आहेत. यामध्ये आमची शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आणखी एका पक्षाचा समावेश आहे, असा दावाही राऊत यांनी केला. दरम्यान, संजय राऊत यांच्या या खळबळजनक आरोपांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात नवा मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची नवी घटना रीतसर निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती. तरीही दबावाखाली निर्णय दिला गेला. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीतून देशातील लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही, याचा फैसला होईल आणि हा निकाल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा (Milestone) ठरेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT