Shiv Sena MLA Disqualification Case Important Hearing Today in Supreme Court rahul narwekar Saam TV
देश विदेश

Shivsena Case: विधानसभा अध्यक्षांना दिलेली मुदत आज संपणार; आमदार अपात्रतेचं काय होणार? आज 'सुप्रीम' सुनावणी

MLA Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आमदार अपात्रप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Shiv Sena MLA Disqualification Case

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आमदार अपात्रप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता या सुनावणीला सुरुवात होईल. मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. आमदार अपात्रतेसंदर्भात नवीन वेळापत्रक सादर करा, असे निर्देश कोर्टाने दिले होते.  (Latest Marathi News)

पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) राहुल नार्वेकरांना सुनावलं होतं. इतकंच नाही, तर राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत सादर केलेलं वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं होतं.

तसेच पुढील सुनावणीत सुधारित वेळापत्रक सादर करा, असे निर्देश देखील दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टात सुधारित वेळापत्रक सादर करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष असेल. तसेच कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडेही सर्वांच्या नजरा असतील.

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे. शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे.

विधानसभा अध्यक्षांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही आमदारांच्या अपात्रतेवर वेळकाढूपण केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टा समोर मांडला आहे. त्यामुळे दोन्ही याचिका एकाच वेळी सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT