Bihar MLC election result 
देश विदेश

भाजपचा पराभव, ३० वर्षांचा बालेकिल्ला भुईसपाट! शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत सर्वात मोठा उलटफेर, कुणी मारली बाजी?

बिहारच्या पाटणा शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत आरजेडीचे डॉ. संजीव कुमार सिंह यांनी भाजपचे विद्यमान आमदार प्रा. नवल किशोर यादव यांचा पराभव केला.

Namdeo Kumbhar

Bihar MLC election result : बिहार विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये धक्कादायक राजकीय उलटफेर समोर आला आहे. पाटणा शिक्षक मतदारसंघातूनराष्ट्रीय जनता दल (RJD) चे उमेदवार डॉ. संजीव कुमार यांनी भाजपचे (BJP) दिग्गज नेते नवल किशोर यादव यांचा पराभव केला. संजीव कुमार यांच्या या विजयामुळे भाजपच्या तब्बल ३० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार नवल किशोर यादव यांनी किंचित आघाडी घेतली होती. यादव यांनी सुरूवातीच्या फेरीत १५० मतांनी आघाडी घेतली होती. पण पसंतीच्या मतांच्या मतमोजणीदरम्यान लढतीचे चित्र पालटले. त्यानंतर डॉ. संजीव कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला. राजदचे उमेदवार डॉ. संजीव कुमार सिंह यांनी त्यांचा १,०५७ मतांनी पराभव केला.

पाटणा शिक्षक आमदार बदलला

नवल किशोर यादव हे मागील ३० वर्षांपासून पाटणा शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य होते. पण यावेळी आरजेडीच्या उमेदवाराच्या विजयामुळे मतदारसंघातील राजकीय गणित बदलले आहे. ३० वर्षांची भाजपचं या मतदारसंघात वर्चस्व होतं. पण आता त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे आरजेडीसाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या निवडणुकीत, सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर, पसंतीच्या मतांमुळे निकालावर परिणाम झाला. अखेरीस, डॉ. संजीव कुमार सिंह विजयी झाले आणि नवल किशोर यादव यांचा ३० वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला

जन सूरज आणि काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात

या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाच्या दिव्या ज्योती आणि काँग्रेसचे डॉ. संजय यादव हे देखील उमेदवार होते. निवडणूक जिंकल्यानंतर डॉ. संजीव कुमार सिंह यांनी आपला निकाल शिक्षक समुदायाला समर्पित केला. त्यांनी शिक्षकांचे पाठिंब्याबद्दल आभारही मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापूरचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार! 240 कोटींच्या योजनेसाठी वामन म्हात्रेंची मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

Maharashtra News Live Update : नागपुरात पावसाच्या सरी, सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा

Best Foods To Eat And Avoid For Piles: मुळव्याध असेल तर काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

Chanakya Niti : तुमची ही ५ गुपितं इतरांना माहीतीयेत? मग चाणक्य नीतीचा हा सल्ला नक्की वाचा

LPG Connection Rule : एकाच घरात दोन गॅस कनेक्शन मिळतात का? जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT