Shetkari Andolan Delhi Latest Update Saam TV
देश विदेश

Breaking News: शंभू सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाहा थरारक VIDEO

Delhi Shetkari Andolan News: हरियाणातील शंभु सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Satish Daud

Farmer Protest in Delhi Latest News

केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमा सील केल्या असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी (Police) रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पीटीआयने आपल्या अधिकृत X अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन थांबवावं तसेच दिल्लीच्या दिशेने जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, शेतकरी कुणाचंही ऐकण्यास तयार नाहीये. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर दिल्लीत धडकणारच असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.

शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा हायकोर्टात पोहचलं आहे. शंभू सीमेवर ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन मशीन जमा करणे हा कायदा आणि सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे, पंजाब सरकारने यावर कारवाई करावी असं हरियाणा म्हणत हरियाणा सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT