शरद पवार सोनिया बैठक SaamTvNews
देश विदेश

शरद पवार सोनिया बैठक; बैठकीला संजय राऊतही उपस्थित! काय झाली चर्चा? वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या अचानक भेटीवरून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. युपीएचा घटक पक्ष नसलेल्या शिवसेनेलाही या बैठकीत निमंत्रण होते. सेना आता यूपीएचा भाग होणार असल्याचेही आता मानले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या अचानक भेटीवरून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खासदार निलंबनावरून राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घडणाऱ्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज शरद पवार, फारुख अब्दुल्ला, टीआर बालू या युपीएतील घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर सायंकाळी ही चर्चा झाली. युपीएचा घटक पक्ष नसलेल्या शिवसेनेलाही या बैठकीत निमंत्रण होते. सेना आता यूपीएचा भाग होणार असल्याचेही आता मानले जात आहे.

राज्यसभेतील निलंबित खासदारांनी माफी मागायचा प्रश्नच नाही, असा पवित्रा या बैठकीत घेण्यात आल्याचे तसेच या मुद्द्यावर शरद पवार राज्यसभा सभापतींना भेटावे, अशी सूचना पुढे आल्याचे समजते. सोनिया गांधींच्या १०, जनपथ या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये राहुल गांधी त्याचप्रमाणे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे देखील उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने संसदेतील तिढा आणि राज्यसभेतील खासदार निलंबनाबाबतची सरकारची भूमिका यावर चर्चा झाली.

हे देखील पहा :

मागील अधिवेशनात गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेमध्ये काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस, शिवसेना, द्रमुक, डावे पक्ष या विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांनी माफी मागितल्याखेरीज निलंबन रद्द केले जाणार नाही असा सरकारने पवित्रा घेतला आहे. तर, जनहिताचे मुद्दे मांडल्यामुळेच सरकारने निलंबनाची कारवाई केली, असे विरोधकांचे म्हणणे असून संघर्षामुळे राज्यसभेचे कामकाजही एका अर्थाने ठप्प झाले आहे.

या प्रकरणात सरकारवर दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांनी आज एकजूट होत संसद ते विजय चौक असा मोर्चाही काढला होता. त्यानंतर सोनिया गांधींनी ज्येष्ठ नेत्यांशी बोलावून विचार विनिमय केला. या संवेदनशील मुद्द्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना भेटून विनंती करण्याबाबतही चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभापतींना भेटून निलंबित खासदारांची बाजू मांडावी, असे बैठकीत ठरल्याचे समजते.

दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत, द्रमुक नेते टी. आर. बालू यांनी संसदेतील स्थितीबाबत या बैठकीत बोलणी झाल्याचे सांगितले. तर, निलंबित खासदार माफी मागणार नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले. नॅशनल काॅन्फरन्सचे नेते डाॅ. फारुख अब्दुल्ला यांनी, सोनिया गांधींसमवेतच्या बैठकीत देशातील चिंताजनक परिस्थितीचा एकत्रितपणे कसा मुकाबला करता येईल याची चर्चा झाल्याचे सांगितले. विरोधी पक्षांमध्ये या मुद्द्यावर समन्वय असल्याचाही दावा डाॅ. फारुख अब्दुल्ला यांनी केला.

संजय‌ राऊत पुढे म्हणाले, "आजची बैठक पूर्वनियोजित होती. बैठक बंद दाराआड होती. राजकीय स्वरुपाची बैठक होता. त्यातील अनेक गोष्टी सांगता येत नाही. आम्ही दीर्घ चर्चा केली आहे. पुढची रणनीती काय करता येईल याची चर्चा झाली. आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होतं मात्र ते प्रवास करू शकत नाहीत त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो."

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty liver disease: लिव्हरवर चरबी जमा झालीये? हे 5 बदल करा, मेणासारखं वितळेल फॅट

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT