Air India Case Saam Tv
देश विदेश

Air India Case : विमानात महिलेवर लघुशंका करणारा शंकर मिश्रा अखेर अटकेत, बेंगळुरू येथून अटक

दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बेंगळुरूमधून अटक केली आहे.

वृत्तसंस्था

Air India Case : एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला दिल्लीतही आणण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बेंगळुरूमधून अटक केली आहे. ही घटना 26 नोव्हेंबर 2022ची आहे, पण एअर इंडियाने 28 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांना याची माहिती दिली होती. यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

आरोपी बराच काळ फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होते. त्यावेळी विमानात बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या शंकर मिश्रा याने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली.

शंकर मिश्रा यांचे शेवटचे लोकेशन बेंगळुरू होते, त्याच आधारे त्याचा शोध सुरू होता. दिल्ली पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, 3 जानेवारी रोजी शंकर मिश्रा याचा मोबाईल फोन बेंगळुरूमध्ये सक्रिय होता. मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. बेंगळुरूपूर्वी दिल्ली पोलिसांनी मुंबईला अनेक पथके पाठवली होती, पण तिथे त्याचा शोध लागला नाही.

या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर आरोपी शंकरला त्याच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं. शंकर मिश्रा हे वेल्स फार्गो कंपनीत उपाध्यक्ष होते. ही कंपनी अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा महामंडळाशी संबंधित आहे.

महिलेला 15 हजार रुपयांची भरपाई दिली होती

याआधी शुक्रवारी महिलेचे काही मेसेज शेअर करत शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी दावा केला होता की पीडितेने कथित कृत्य माफ केलं होतं आणि तक्रार नोंदवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. मिश्रा यांच्या वकिलाने दावा केला की मिश्राने पीडितेला नुकसान भरपाई म्हणून 15,000 रुपये दिले होते, जे नंतर पीडितेच्या कुटुंबाने परत केले. त्याचवेळी, शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT