rape by tantrik
rape by tantrik google
देश विदेश

बुद्धी तल्लख करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने केला तरुणीवर बलात्कार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेश : उज्जैनमधून (ujjain) २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार (sexual abuse) झाल्याची घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या (superstition) नावाखाली एका तांत्रिकाने (tantrik) एका मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी (police) आरोपी तांत्रिकाला अटक (arrest) केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

२१ वर्षीय पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. तिची आई तिच्या मुलीची बुद्धी तल्लख करण्यासाठी तांत्रिकाकडे घेऊन गेली होती. यादरम्यान आरोपीने आईला काहीतरी बहाणा करून खोलीबाहेर नेले आणि मुलीवर बलात्कार (sexual abuse) केल्याची घटना घडली.

पीडितेच्या आईचे म्हणणे आहे की, तिची मुलगी बुद्धीने थोडी कमजोर आहे. उपचारासाठी त्यांनी देवास येथील एका व्यक्तीशी संपर्क साधला जो जादूटोण्याचं काम करतो. जेव्हा आपल्या मुलीला तांत्रिकाकडे घेऊन गेली तेव्हा त्या तांत्रिकाने बतावणी केली सांगितले की, मुलीला भुतांनी पछाडले आहे. असे म्हणत तिला खोलीबाहेर काढले आणि दरवाजा बंद केला. ती आपली मुलगी बरी होण्याची वाट पाहत राहिली.

पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, खोलीत तिच्या मुलीला नशेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर बलात्काराची घटना घडवून आणली. यासोबतच मुलगी शुद्धीवर आल्यानंतर बरी झाल्याचेही तांत्रिकाने सांगितले. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि ती भांबावून गेली. तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT