Serial Kisser Arrested  Saam TV
देश विदेश

Serial Kisser Arrested : अचानक यायचा आणि महिलांना किस करून पळायचा; 'सीरियल किसर' पोलिसांच्या ताब्यात

Serial Kisser News : भररस्त्यात एक तरुण महिलांना तसेच तरुणींना जबरदस्ती किस करायचा आणि पळून जायचा. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

Satish Daud

Bihar Serial Kisser Arrested : भररस्त्यात एक तरुण महिलांना तसेच तरुणींना जबरदस्ती किस करायचा आणि पळून जायचा. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या तरुणासह त्याच्या टोळक्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे होतं. अखेर पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरुणासह त्याच्या इतर ४ साथीदारांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका ‘सीरियल किसर’ने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आरोपी तरुण हा अनोळखी महिला आणि मुली रस्त्यावरून जात असताना अचानक यायचा आणि त्यांना जबरदस्ती किस करून पळून जायचा. या संपूर्ण प्रकाराचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते.

भरदिवसा घडणाऱ्या या घटनेमुळे (Crime News) जमुई जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या तरुणाला तातडीने अटक करा, अशी मागणी महिलांकडून केली जात होती. यासंदर्भातील तक्रारी सुद्धा पोलिसांत दाखल झाल्या होत्या. आरोपीचा शोध घेणं पोलिसांपुढे आव्हान होतं. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महिलेचं चुंबन घेऊन काढला होता पळ

१० मार्च रोजी जमुईच्या सदर हॉस्पिटलच्या आवारात चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी महिला मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. अचानक एक तरुण भिंतीवरून उडी मारून आवारात आला. त्याने महिलेला पाठीमागून पकडलं आणि जबरदस्तीने चुंबन घेतले.

अचानक आपल्यासोबत घडलेल्या या भंयकर प्रकारामुळे महिला भयभीत झाली. महिलेला या तरुणाला विरोध केला. मात्र, तरी देखील त्याने महिलेचे चुंबन घेणं काही सोडले नाही. काम फक्ते होताच, आरोपी तरुणाने महिलेला ढकलून दिलं आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर महिला प्रचंड संतापली. तिने अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना तरुणाची ओळख पटली. पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरुणासह त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. हे टोळकं भरदिवसा महिलांसोबत गैरवर्तन करायचं आणि रात्री जबर चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold- Silver Price Hike: एका रात्रीत सोनं-चांदी महागलं, भाव गगनाला भिडले; 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कारवर पहाटे हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

NEET UG Exam: नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

Chanakya Niti: या 5 क्वालिटी तुम्हाला बनवतील बॉस, वाचा चाणक्यांनी दिलेल्या खास टिप्स

Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

SCROLL FOR NEXT