Srinagar: 24 तासांत दहशतवाद्यांची दुसरी हत्या, नागरिकांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार Saam Tv
देश विदेश

Srinagar: 24 तासांत दहशतवाद्यांची दुसरी हत्या, नागरिकांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार

जम्मू- काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी आता सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी आता सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. श्रीनगरमधील बोहरी कदल भागात काल दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये kashmir २४ तासांत झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. जम्मू- काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा या ठिकाणी मोहम्मद इब्राहिम खान (वय-४५) यांची काल दहशतवाद्यांनी Terrorist गोळ्या झाडून हत्या केली आहेत.

मोहम्मद हे सेल्समन म्हणून काम करत असत. रुग्णालयात उपचारादरम्यान इब्राहिम यांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, श्रीनगरमधील बांदीपोरा या ठिकाणी निवासी गुलाम मोहम्मद खान यांचा मुलगा मोहम्मद इब्राहिम खान यांना जवळून गोळी मारण्यात आली आहे. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. खान यांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात एकूण नागरिकांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार की, आम्ही गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे. या घटनेवर पोलिसांनी परिसराला मोठ्या प्रमाणात घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. त्यांनी सांगितले की, इब्राहिम खान जवळच्या महाराजगंज परिसरात सेल्समन म्हणून काम करत असायचा.

याअगोदर रविवारी काश्मीरमधील बटमालू भागातील एसडी कॉलनीत २९ वर्षीय तौसीफ या पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्यात गोळी लागली होती. कॉन्स्टेबल तौसीफ अहमद असे त्याचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा श्रीनगरच्या बटमालू भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. ही घटना घडवून दहशतवादी तिथून पळून गेले आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईला घाबरले दहशतवादी सामान्य नागरिक, पोलीस आणि लष्कराच्या जवानांना सध्या मोठ्या प्रमाणात लक्ष्य करत आहेत. २ दिवसांपूर्वी श्रीनगरमधील SKIMS मेडिकल कॉलेजच्या बाहेर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला होता. ही घटना घडवून दहशतवादी पळून गेले आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरक्षा दलाच्या एकाही जवानाला इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी नागरिकांच्या हत्येचा निषेध करण्यात आला आहे. ओमर यांनी ट्विट देखील केले की, 'इब्राहिमची क्रूर हत्या निंदनीय आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करत आहे. दुर्दैवाने, इब्राहिमची हत्या ही खोऱ्यातील, विशेषतः श्रीनगरमधील लक्ष्यित हत्यांच्या मालिकेत नवीनतम घटना आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात स्थान देवो.'

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर नवरदेव नववधू मतदानासाठी

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

Maharashtra Live News Update: प्रेम कुमार यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

Ranveer Singh: मी माफी मागतो...; 'कांतारा' च्या देवाला 'महिला भूत' म्हणल्याने रणवीर सिंह अडचणीत, स्पष्टीकरण देत म्हणाला...

मतमोजणीची अशी चूक पुन्हा नकोच, निवडणुकीसाठी गाईडलाईन्स करा, कोर्टाने आयोगाला सुनावले

SCROLL FOR NEXT