School Holiday Saam tv
देश विदेश

School Holiday: दिल्ली, उत्तर प्रदेशसह या राज्यातील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी; महाराष्ट्रात काय स्थिती?

School Holiday for 10 to 15 Days: देशात थंडीचा जोर वाढत आहे. यानिमित्त विविध राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा जवळपास १०-१५ दिवस बंद असणार आहेत.

Siddhi Hande

देशात थंडीचा जोर वाढला

थंडीमुळे अनेक राज्यातील शाळांना सुट्ट्या

अनेक राज्यात १०-१५ दिवस शाळा राहणार बंद

देशात सध्या थंडीचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यात दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाचीही समस्या आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये तर उणे तापमान आहे. त्यामुळे या प्रदेशात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त शाळा बंद असणार आहे. अनेक राज्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा जवळपास १० ते १५ दिवस बंद असणार आहे.

या राज्यात शाळांना सुट्टी (School Holiday for 10 to 15 Days)

दिल्लीत १० ते १५ दिवस शाळा बंद

दिल्लीत खूप जास्त वायूप्रदुषण होत आहे. यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांना २३ डिसेंबरपासून ते १ जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. त्यानंतर पुन्हा ३ आणि ४ जानेवारीला शाळांना सुट्टी असणार आहे. दिल्लीसह नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम येथेही शाळा बंद असणार आहे.

हरियाणात शाळांना सुट्टी (Haryana School Holiday)

हरियाणात थंडीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या राज्यात १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत थंडीमुळे सुट्टी दिली जाऊ शकते. त्यानंतर पुन्हा २५,२६, २७ डिसेंबरला शाळांना सुट्टी असणार आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये खूप जास्त थंडी आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गाझियाबादमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहे.

बिहार (Bihar School holidays)

बिहारमध्येही अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. थंड प्रदेशात पटना, मुजफ्फरपुर, अररिया, बांका या ठिकाणी शाळेची वेळ ९.३० ते ४ वाजेपर्यंत शाळा असणार आहे.

पंजाब (Punjab School Closed)

पंजाबमध्ये सर्वात जास्त थंडी आहे. यामुळे २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा शनिवार, रविवार आल्याने शाळा थेट ५ जानेवारीला सुरु होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT