SBI Bank Saam TV
देश विदेश

SBI Bank News: एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; खातेदार २ दिवसांपासून वैतागले, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस, कारण?

साम टिव्ही ब्युरो

SBI Services Down : स्टेट बँक ऑफ इंडिया बँक देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग आणि यूपीआय सर्व्हिसवर परिणाम झाला आहे.

एसबीआय बँकेच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून तक्रारी येत होत्या. आज सोमवारी एसबीआय बँकेचं सर्व्हर बंद असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. आतापर्यंत १७०० जणांनी तक्रारी केल्या आहेत. (Latest Marathi News)

एसबीआयच्या (SBI) अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले होती, १ एप्रिल २०२३ रोजी मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग आणि यूपीआय सेवा दुपारी १.३० ते ४.४५ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

या ट्विटनंतर अनेकांना वाटले की, सर्व सेवा या पुन्हा सुरू होतील. मात्र, एसबीआयच्या सेवा अद्याप अद्यवत झालेल्या नाहीत. त्यामुळे एसबीआयच्या अनेक ग्राहकांना सेवेचा लाभ घेताना अडथळे येऊ लागले आहेत.

एसबीआयच्या सेवा १ एप्रिलपासून डाऊन आहे. एसबीआयच्या बँकेच्या अनेक खातेदारांनी ट्विटर हँडलवरून तक्रारींचा पाऊस पाडला आहे. तसेच एसबीआयचे योनो अॅप ग्राहकांना देखील सेवेचा लाभ घेताना अडथळे येऊ लागले आहे.

आर्थिक वर्ष संपत असल्याने अशा समस्या येत असल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. एसबीआयचं सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक ग्राहकांचे क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यात देखील अडथळे येत आहे.

खातेदारांना ३२ तासांपासून होतोय त्रास

भारतीय स्टेट बँकेच्या एका युझरने म्हटले आहे की, एसबीआयचे संपूर्ण पेमेंट गेटवे गेल्या ३२ तासांपासून कामात अडथळे येत आहेत. या बँकेकडून सांगण्यात आले की, 'प्रिय ग्राहक आम्ही असुविधेमुळे माफी मागतो. आपल्याला विनंती आहे की, तुम्ही पुन्हा प्रयत्न करून पाहा आणि समस्या पुन्हा आल्यास आम्हाला कळवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT