Sharad Pawar, Sanjay Raut,
Sharad Pawar, Sanjay Raut,  Saam Tv
देश विदेश

राऊत म्हणतात... पवारच ठरतील मोदींना पर्याय!

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ शरद पवारच पर्याय ठरु शकतात, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या UPA बाबतच्या भूमीकेबद्दल बोलताना राऊत यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. (Sanjay Raut quote about Sharad Pawar and UPA)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. पण देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातला विरोधी पक्ष एकत्र यावा, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरतायत, काही हालचाली ठरतायत आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन याबाबतीत आम्हाला नेहमी लाभत असते. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही समजून घेऊ."

पुढे ते म्हणाले, "शरद पवार यांच्या प्रयत्नांशिवाय, यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत. जे सक्षम आहेत. त्या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी. हे आम्हालाही माहित आहे. पण त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याने पुढे यावे, अशी आमची भूमिका आहे", असे संजय राऊत म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

राज-गडकरी भेट: राऊत म्हणतात...रात गई बात गई!

ते म्हणाले की, अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो. प्रत्येक भेटीमागे काही तरी राजकारण असतं असं नाही. दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, त्याविषयी फार काही बोलावं अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका शिवसेना ताकदीने लढेल. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसं, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थानं केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली तरी काही आम्हाला फरक पडत नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ टीम इंडियावर भारी पडणार? IND vs PAK सामन्याबाबत बोलताना हरभजन सिंग काय म्हणाला?

World Hypertension Day: World Hypertension Day 2024: जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन का साजरा करतात? जाणून घ्या

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT