Sanjay Raut News SaamTv
देश विदेश

Maharashtra Political Crisis: गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis: 'गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला, अशी टीका राऊत यांनी केली केली.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

New Delhi: राज्यातील राजकीय भूकंपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी बंड करत सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या निर्णयामुळे शरद पवारांना धक्का बसला आहे. या सर्व राजकीय घडमोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर हल्लाबोल केला आहे. 'गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला, अशी टीका राऊत यांनी केली केली. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. संजय राऊत म्हणाले, 'आज गुरुपौर्णिमा आहे. आमचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला. काल समृद्धी महामार्गावर अपघात झाला. त्यांच्या चिता जळत असताना ज्या राजभवनावर शपथविधी जल्लोषात साजरा झाला हे निर्दयी आहे'.

'प्रेत पडलेली आहेत, नातेवाईकांचा आक्रोश आहे आणि इकडे राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते. या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

'महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, इतिहासातून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास पुसण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हा खेळ सुरू आहे, तो लोकशाही आणि देशाला परवडणारा नाही, असेही राऊत पुढे म्हणाले.

शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, 'सध्याचे मुख्यमंत्री आणि सोबतचे १६ आमदार घरी जाणार आहरे. ते अपात्र ठरणार आहे. १० ऑगस्टपर्यंत हा निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी ही तयारी सुरू आहे'. संजय राऊतांनी टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे आता पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? प्रत्येक लेव्हलसाठी पगारवाढ वेगळी होणार

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर काोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली

Chandra Grahan: चंद्र ग्रहण असताना रंगपंचमी खेळू शकतो का? जाणून घ्या

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं

SCROLL FOR NEXT