Toll Tax Saam Tv
देश विदेश

Toll Tax: देशभरात सगळीकडे एकसारखाच टोल होणार, नितीन गडकरींची माहिती

Same Toll Across Country: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरात आता सर्व महागामार्गांवर एकसारखाच टोल लागू होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

Siddhi Hande

केंद्रीय रस्ते वाहतूक अन् महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. आता देशभरात सगळीकडे एकसारखा टोल लागू करण्याबाबत काम सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या काळात देशभरात सगळीकडे समान टोल आकारला जाईल, असंही त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. एकसमान टोल धोरणावर सध्य काम सुरु आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, आम्ही एकसमान टोल धोरणावर काम करत आहोत. यामुळे प्रवाशांच्या अडचणी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या निर्णयामुळे देशात लवकरच सगळीकडे एकसमान टोल लागू होऊ शकतो. (Same Toll Across Country)

नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सोशल मीडियावरील प्रवाशांच्या तक्रारी गांभीर्याने घेत आहेत. त्याचसोबत त्यावर काम करत आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गांवर ६० टक्के वाहने ही खाजगी आहेत. तर टोल वसूलीत त्यांना २०-६० टक्के वाटा आहे. त्यामुळे टोल आकारणी वाढली आहे. यामुळे प्रवाशांना जास्त त्रास होत आहे.

२०२३-२४ मध्ये टोल वसूल ६४,८०९.०६ कोटी रुपये झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्के जास्त आहे. सध्या चालू वर्षात आतापर्यंत ७००० किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पूर्वी मंत्रालयात ३००० कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता.

मात्र, आता मंत्रालय नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ शकत नाही. त्यामुळे १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे प्रकल्प मंजुरी केले जातील. तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल. सध्या ५०-६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले आहेत. लवकरच या प्रकल्पांवर काम सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT