शिवाजी शिंदे
salary deduction for not caring parents India fact check : आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता दावा केलाय की आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे...सरकारने असा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच असा निर्णय सरकारने घेतलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
आई-वडिलांचा सांभाळ जी मुलं करणार नाहीत, त्यांच्या पगारातून आता पैसे कट केले जाणार आहेत...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...वृद्धापकाळात पालकांना जी मुलं त्रास देतील, त्यांना सांभाळणार नाही, अशा मुलांची तक्रार केल्यास दर महिन्याला पगार कापला जाणार आहे...असा निर्णय सरकारने घेतल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेज जी मुलं आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांचा पगार कापला जाईल. एकूण पगारातून दरमहा 15% किंवा 10 हजार रुपये कट केले जातील.
हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...हा निर्णय वृद्ध आई-वडिलांसाठी दिलासा देणारा आहे...त्यामुळे खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...आम्ही याबाबत माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
साम इन्व्हिस्टिगेशन
तेलंगणा सरकारने महत्त्वाचे विधेयक मंजूर केलंय
तेलंगणा कर्मचारी जबाबदाऱ्या, पालकत्व देखरेख विधेयक
कर्मचाऱ्यांवर पालकत्वाच्या देखभालीसाठी जबाबदारी
याची व्याप्ती फक्त सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही
खाजगी कर्मचारी,आमदार, सरपंच, लोकप्रतिनिधींचा समावेश
हे विधेयक पालकांना त्यांच्या मुलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार देतं...तक्रार निवारणासाठी एक औपचारिक यंत्रणा उपलब्ध करून देते...तर नवीन विधेयकानुसार, जे कर्मचारी आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळतील, त्यांच्या एकूण पगारातून पैसे कापले जातील...आणि कापलेली रक्कम त्यांच्या पालकांना दिली जाईल...हा निर्णय महाराष्ट्र सरकारचा नाही...तेलंगणा सरकारचा आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत आई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांच्या पगारात कपात होणार असल्याचा दावा सत्य ठरलाय...
ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.