saharanpur shocking Saam tv
देश विदेश

'सैराट'चा पुन्हा थरार! भर रस्त्यात मेव्हण्याने बहिणीचं कुंकू पुसलं, गोळ्या झाडून दाजीला संपवलं

saharanpur shocking : सहारनपूरमध्ये 'सैराट'चा थरार घडला आहे. भर रस्त्यात मेव्हण्याने दाजीची हत्या करून बहिणींचं कुंकू पुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये घडला सैराटचा थरार

बायकोसमोर पती शिव कुमार यांची गोळ्या झाडून हत्या

हत्येच्या घटनेने सहारनपूरमध्ये खळबळ

उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात पोलीस भरती परीक्षा केंद्राबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. बाबरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २४ वर्षीय शिव कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बायको पोलीस भरती परीक्षा केंद्रातून बाहेर आली. त्यानंतर पती शिव कुमार बायकोसोबत कारने घरी जात होते, त्याचवेळी मेव्हण्याने दाजी शिव कुमार यांना गोळ्या झाडून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहारनपूरमध्ये 'सैराट'चा थरार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी सहारनपूरच्या गोचर इंटर कॉलेजला आली होती. तिच्यासोबत पती शिव कुमार देखील होते. पत्नी आकांक्षा कॉलेजमध्ये परीक्षा द्यायला गेली. तर शिव कुमार केंद्राबाहेर वाट पाहत बसले होते. परीक्षा झाल्यानंतर आकांक्षा आणि शिव कुमार कारने घरी जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी एका हल्लेखोराने शिव कुमार यांच्यावर गोळीबार केला.

आकांक्षाचा भाऊ मंजीतनेच शिव कुमार यांच्या डोक्यावर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोळीबारात शिव कुमार गंभीर जखमी झाला. भर रस्त्यात झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ माजली. आसपासच्या लोकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने शिव कुमार यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर शिव कुमार यांना मृत घोषित केले. २४ वर्षीय शिव कुमार यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रेमविवाहामुळे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृत शिव कुमार यांची पत्नी आकांक्षाने पोलिसांना सांगितलं की, माझं शिव कुमार यांच्याशी चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला. आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. कुटुंबाच्या नाराजीनंतरही आम्ही दोघांनी लग्न केलं. माझ्या लग्नाने माहेरचे मंडळी खूश नव्हते. लग्नानंतरही माझ्या माहेरचे मंडळी लग्नाला विरोध करत होते. यामुळे भाऊ मंजीतने माझ्या नवऱ्याची हत्या केली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT