Model Sadhvi Viral On Social Media livehindustan
देश विदेश

MahaKumbh : महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Model Sadhvi Viral On Social Media: महाकुंभ 2025 मधील एका महिलेचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ती संत असल्याचे सांगितले जात होते. सोशल मीडियावर चर्चेला उधाण आल्यानंतर या तरुणीने स्वतः खुलासा केलाय.

Sandeep Chavan

महाकुंभात एक देखणी साध्वी आलीय. या देखण्या साध्वीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांना उत्सुकता आहे ही साध्वी आहे तरी कोण? तिचं नाव काय? आम्ही हे सगळं शोधून काढलंय. खरंच ही तरुणी साध्वी आहे का...? पाहुयात यामागचं व्हायरल सत्य. .प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होतेय.

कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये करोडो लोक सहभागी झालेयत...ही साध्वीही महाकुंभात सहभागी झालीय...करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असं म्हणाले...तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्या...काय मेसेज व्हायरल होतायत पाहुयात.

व्हायरल मेसेज

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात देखणी साध्वी आलीय.ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून, आचार्य महामण्डलेश्वर स्वामी कैलाशनंदगिरी महाराजांची शिष्य आहे. हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही साध्वी आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.आमच्या व्हायरल सत्य टीमने या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

व्हिडिओत दिसणारी साध्वी नसून मॉडेल

हर्षा रिछारिया असं 30 वर्षीय मॉडेलचं नाव

हर्षा अँकरिंग, मॉडेलिंग, अॅक्टिंगही करते

मूळची भोपाळची रहिवासी, सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य

अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभमेळ्यात सहभागी

हर्षा ही कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती.त्यामुळे आमच्या व्हायरल टीमने हर्षाशी संपर्क साधला.तेव्हा ती काय म्हणाली पाहुयात.

हर्षा रिछारिया काय म्हणाली?

मी अजूनही साध्वी बनले नाही. साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोषाख पाहून लोकांनी माझे नाव साध्वी हर्षा ठेवले. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय. हे सर्व पाहून बरं वाटतं पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही.

दोन महिन्यांपूर्वी हर्षा रिछारियाने बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता...ती मॉडेलिंगमध्ये करियर करतेय.त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओत दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरला. हर्षा रिछारिया ही साध्वी नसून, मॉडेल असल्याचं समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

SCROLL FOR NEXT