Russian military aircraft Antonov An-26 crash in Crimea claims 29 lives. saam tv
देश विदेश

Plane Crash: टेकऑफनंतर रडारमधून झालं गायब; रशियन लष्कराचं विमान कोसळलं, २९ जणांचा मृत्यू

Military Plane Crash: उड्डाणानंतर थोड्याच वेळात रडारवरून गायब झालेले रशियन लष्कराचे अँटोनोव्ह एएन-२६ विमान क्रिमियामध्ये कोसळले. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

  • क्रिमिया येथे रशियन लष्करी विमान कोसळलं

  • २९ जणांचा मृत्यू, सर्वांचा जागीच मृत्यू

  • टेकऑफनंतर रडारमधून गायब

रशियाच्या संरक्षण दलाचे एक विमान कोसळले असून या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. क्रिमिया बेटावर रशियाचं अँटोनोव्ह-२६ हे लष्करी मालवाहू विमान कोसळलं असून या दुर्घटनेत ६ क्रू मेंबर्स आणि २३ प्रवासी अशा एकूण २९ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास हे विमान क्रिमियाच्या आकाशात असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. रडारवरून विमान गायब झाल्याचं लक्षात येताच शोध आणि बचाव पथक कामाला लागले. काही तासांतच बचाव पथकाला विमानाचा ढिगारा सापडला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटने प्रकरणी म्हटले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विमानाशी संपर्क तुटला होता. विमानावर कोणत्याही हल्ला झाला नाहीये. तशी कोणतीच चिन्हे नाहीत. त्यामुळे क्षेपणास्त्रे, ड्रोन किंवा पक्ष्यांची धडक बसून हा अपघात झाला नाही. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक लष्करी आयोग पाठवण्यात आला आहे.

हे 'अँटोनोव्ह-२६' मॉडेल विमान रशियाच्या ताफ्यातील जुनं आणि विश्वासार्ह मानलं जातं. विमान आहे. या विमानांची निर्मिती १९६९ ते १९८६ या काळात युक्रेन येथील कारखान्यात करण्यात आली होती. रशियाने आतापर्यंत अशी एकूण १३९८ विमानं तयार केली असून ती हंगेरीपासून क्युबापर्यंत अनेक देशांना विकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT