Russia Vs Sweden Saam Tv News
देश विदेश

Russia Vs Sweden : स्वीडनमध्ये घुसली रशियाची बॉम्बर लढाऊ विमानं; NATO हाय अलर्टवर, पहा Video

Sandeep Gawade

युक्रेन आणि रशियात गेल्या दिड वर्षांपासून घणघोर युद्ध सुरू आहे असून दोन्ही देशांमधील तणाव थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. दरम्यान नाटोचा सदस्य असलेल्या स्वीडनच्या हद्दित रशियाच्या बॉम्बर लढाऊ विमानांनी प्रवेश केला त्यामुळे युरोपमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. रशियाने हवाई हद्दिचं उल्लंघन केल्यामुळे NATO हाय अलर्टवर आहे.

रशियन SU-24 बॉम्बरने बाल्टिक समुद्रातील गोटलँड या मोक्याच्या बेटाजवळ स्वीडिश हवाई हद्दित शिरली होती. स्वीडिश एअर कॉम्बॅट कमांडने रशियन विमानाला माघारी फिरण्याची चेतावणी दिली, मात्र रशियाची विमानं आपल्या मार्गावरून हलली नाहीत. त्यामुळे दोन स्वीडिश जेएएस-३९ ग्रिपेन लढाऊ विमानांनी रशियाचा बॉम्बरना माघारी पाठवलं.

स्वीडन नाटोचं पूर्ण सदस्यत्व मिळून केवळ तीनच दिवस झाले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटोने हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर युरोपमधील इतर देशही हाय अलर्टवर आहेत. स्वीडनच्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी दुपारी शियन Su-24 बॉम्बर विमानाने गोटलँडच्या दक्षिणेकडील भागात स्वीडिश हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं. गॉटलँड रशियामधील कॅलिनिनग्राडपासून 350 किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गोटलँडवर नियंत्रण मिळवलं तर बाल्टिक समुद्रातील हवाई आणि नौदलाच्या हलचालींवर लक्ष ठेवता येतं. त्यामुळेच रशियाचा या भागावर डोळा आहे.

स्वीडनचे हवाई दल प्रमुख जोनास विकमन म्हणाले, रशियाची कृती अस्वीकार्य आहे आणि आमच्या प्रादेशिक अखंडतेला बाधा पोहोचवणारी आहे. 2022 मध्ये मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्वीडनने नाटोत सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मार्च २०२२ मध्येही रशियाने स्वीडनच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केले होतं. जेव्हा स्वीडनच्या लढाऊ विमानांनी दोन Su-24 आणि दोन Su-27 लढाऊ विमानांना गॉटलँडवर रोखलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT