Russia-Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine: मानवता हरली; नवजात बालकांना बंकरमध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ, पाहा मन सुन्न करणारा व्हिडीओ

शियन सैन्याकडून करण्यात येणाऱ्या मिसाईल हल्ल्याचे बळी रुग्णालयांसारख्या नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या इमारती पडत आहेत.

वृत्तसंस्था

Russia-Ukraine War: युक्रेनची राजधानी कीववर आता रशियन सैन्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. युक्रेनच्या (Ukraine War) लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी रशियन सैन्याकडून करण्यात येणाऱ्या मिसाईल हल्ल्याचे बळी रुग्णालयांसारख्या नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या इमारती पडत आहेत. याचच एक उदाहरण म्हणजे, युक्रेनच्या रुग्णालयातील नवजात बालकांना बॉम्ब शेल्टरमध्ये ठेवल्याचा मन सुन्न करणारा व्हिडीओ पुढे आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने हा व्हिडीओ जारी केला आहे (Russia-Ukraine War New Born Babies moved into bomb shelter In Ukraine).

ही बालकं (New Born) युक्रेन (Ukraine) च्या चिल्ड्रन हॉस्पिटलमधील असल्याचा दावा केला जात आहे. रशियन हल्ल्यांनंतर या बालकांना आता बॉम्ब शेल्टर (bomb shelter) मध्ये ठेवण्यात आले आहे. या बालकांना बॉम्ब शेल्टरमध्येच ऑक्सिजन लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. खरंच माणुसकी हरली की काय असा प्रश्न नक्कीच मनात येईल.

पाहा मन हेलावणारा व्हिडीओ -Volodymyr Zelenskyy

रशियाचा कीव्हवर रॉकेट हल्ला, युक्रेनचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी गुरुवारी युक्रेनवर हल्ला करत युद्ध घोषित केले. यानंतर युक्रेननेही रशियाविरुद्ध युद्ध घोषित केले असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी देशभरात सैन्य तैनात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यासोबतच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि नाटो देशांवरही निशाणा साधला असून रशियासोबतच्या लढाईत आपण एकाकी पडलो, असे म्हटले आहे.

रशिया (Russia) ने कीव्हवर रॉकेटने हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी या हल्ल्याची माहिती देताना पुतिन यांना थांबवा आणि रशियाला एकटे पाडा, असे सांगितले. रशियाला सर्व ठिकाणांहून बाहेर काढा, रशिया सतत युक्रेनची राजधानी कीव्ह जवळून फिरत आहे. 1941 मध्ये राजधानीवर शेवटच्या वेळी असा हल्ला झाला होता. जेव्हा नाझी जर्मनीने हल्ला केला. युक्रेनने त्याचा पराभव केला आणि आता पुतिनलाही रोखणार आहे, असंही ते म्हणाले.

मी रशियाचा पहिला टार्गेट - युक्रेन राष्ट्राध्यक्ष

कीव्हमधील स्फोटांच्या वृत्तानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, ते रशियाचे पहिले लक्ष्य आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले की, "पाश्चात्य नेत्यांशी बोलल्यानंतर मी निराश झालो आहे. युक्रेनशी लढायला कोणी तयार नाही. रशियन हल्ल्यात आतापर्यंत 137 लोक मारले गेले आहेत आणि 316 जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली. तर, कीव्हमधील मेट्रो स्टेशन लोकांसाठी बॉम्ब शेल्टर बनले असून रशियन हल्ल्यानंतर कीव्हमधील जवळपास प्रत्येक स्टेशनवर मोठ्या संख्येने लोकांनी आश्रय घेतला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT