Russia-Ukraine Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine war: युक्रेनच्या ५० ठिकाणांवर रशियाकडून ड्रोन हल्ला; रेल्वे स्टेशनवर जोरदार गोळीबार,६ जणांचा मृत्यू

Russia-Ukraine : रशियन ड्रोन आणि तोफ हल्ल्यात ६ युक्रेन नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यात एका मोठ्या शहरातील वीज खंडित झालीय. युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेमलिनच्या सैन्याने रात्रभर तोफांमधून बॉम्बचा वर्षाव केला. तसेच ड्रोनसह खेरसन प्रदेशावर बॉम्ब टाकले. रेल्वे स्टेशनवरही रशियाच्या क्रेमलिनच्या सैन्याने गोळीबार केला.

Bharat Jadhav

Russia-Ukraine war Drone Attack In Ukraine:

युक्रेन येथील कीव शहरातील रेल्वे स्टेशनवर वाट पाहणाऱ्या नागरिकांवर रशियाच्या क्रेमलिनच्या सैन्याने गोळीबार केला. तर युक्रेनमधील ५० ठिकाणांवर ड्रोन हल्ला केला. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात किमान ५ जण ठार झाले आणि दक्षिणेकडील खेरसन शहराचा बराचसा भाग वीज खंडित झाला.(Latest News)

एका दिवसापूर्वी युक्रेनच्या (Ukraine) युद्धविमानांनी क्रिमियाजवळील काळ्या समुद्रात डॉक केलेल्या एका रशियन जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर रशियाने (Russia) हा हवाई हल्ला केला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दोन्ही देशात २२ महिन्यांपासून युद्ध चालू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान युक्रेनचे गृहमंत्री (home Minister) इहोर क्लिमेंको यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेमालिनच्या सैन्याने रात्रभर तोफेचा मार करत ड्रोन हल्ले केले. खेरसॉन प्रदेशावर बॉम्बचा वर्षाव केला. दरम्यान खेरसॉन नावाच्या रेल्वे स्टेशनवरदेखील गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी ठार झाला आहे. तर इतर दोन पोलीस अधिकारी आणि २ नागरिक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर उकरझालिझ्नित्सिया यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी ट्रेनची वाट पाहत असलेले १०० हून अधिक लोक बुधवारी सकाळी कीवमध्ये आले होते.

प्रादेशिक गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडिन या हल्ल्याविषयी म्हणाले की, खेरसॉन प्रदेश आणि राजधानीवरील हल्ल्याचा निवासी भाग आणि मॉल तसेच पॉवर ग्रीडला फटका बसला. यामुळे ७० टक्के भागाचा वीज प्रवाह खंडीत झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT